रत्नागिरी येथे एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवल्याचे उघड !
त्याच शाळेतील अन्य एका शिक्षकाने २ दिवसांपूर्वी विद्यार्थिनीशी केले होते गैरवर्तन !
रत्नागिरी – शहरातील एका शाळेत प्रथमेश नवेले या शिक्षकाने एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार १३ जानेवारीला उघडकीस आला होता. याच शाळेतील आणखी एका शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवल्याचे पुढे आले आहे. याविषयी जाब विचारण्यासाठी काही पालकांसह सामाजिक कार्यकर्तेे शाळेत गेले असता आरोपी शिक्षक शाळेतून पसार झाला.
या शिक्षकाचे संदेश पालकांच्या हाती लागले. याचा जाब विचारण्यासाठी पालक शाळेत गेले असता, तो शिक्षक रजेवर असल्याचे सांगण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांनी तो शिक्षक शाळेत असल्याचे सांगितले. या वेळी शहर पोलिसांचे पथकही शाळेत गेले होते; परंतु तो शिक्षक पालकांच्या हाती लागला नाही.
संपादकीय भूमिकाशिक्षकी पेशाला कलंक असलेले वासनांध शिक्षक ! शाळेसारख्या ठिकाणी वारंवार घडणार्या अशा घटना रोखण्यासाठी अशा शिक्षकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |