धर्माची चार युगांतील वैशिष्ट्ये
१. ‘कृतयुगात धर्म चतुष्पाद होता. नारायण शुक्लवर्ण होता.
२. त्रेतायुगात यज्ञ, दान आणि नानाविध धर्म कर्मे यांत लोक तत्पर होते. धर्म त्रिपाद असतो. विष्णु रक्तवर्ण होता.
३. द्वापरयुगात धर्म द्विपाद असतो. लोक सत्यभ्रष्ट होतात. त्यामुळे व्याधी विलक्षण बोकाळतात. लोक काम्यकर्मे करतात. द्वापरयुगात विष्णु पिवळा असतो.
४. कलियुगात धर्म हा एकाच पायावर (दान) उभा असतो. या तामस युगात विष्णु काळा होतो. वेदाचार, धर्म आणि यज्ञकर्म यांचा र्हास होतो. आधी व्याधी, काम, क्रोध, लोभ, मत्सरादि दोष यांची अभिवृद्धी होते.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : साप्ताहिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२४)