धर्मांधतेच्या विरोधात समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि साहस कौतुकास्पद आहे ! पोलिसांनी या संदर्भात काहीच न केल्याबद्दल त्यांना शिक्षा करा !
‘पुणे येथील प्रसिद्ध नानावाड्याच्या जवळ असलेल्या ‘वसंत सिनेमा’च्या पाठीमागे ३ थडगी (मुसलमानाचे प्रेत पुरल्याची जागा) बांधून तेथे अतिक्रमण केले गेले होते. पुण्यातील समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्या ठिकाणी दत्त मंदिर असतांनाही थडगी बांधण्यात आली होती. यानंतर ६ जानेवारी २०२५ या दिवशी समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही थडगी हटवली. या वेळी समस्त हिंदु आघाडीच्या वतीने उज्ज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.’
(८.१.२०२५)