संकटकाळात भारताला सतत साहाय्य करणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन !
गेल्या २५ वर्षांपासून व्लादिमिर पुतिन हे रशियाचे सर्वेसर्वा… या माणसाची स्वतःची शैलीच वेगळी आहे. गेल्या काही वर्षांपासून हा माणूस रशिया सोडत नाही; पण त्याला भेटण्यासाठी जगभरातील नेते रशियाला जातात. भारताचे पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांसह १० हून अधिक देशांचे प्रमुख रशियात जाऊन पुतिन यांना भेटले. अमेरिकेने रशियाला संपवण्यासाठी ५ सहस्र निर्बंध घातले; पण एकटे पुतिन त्यांना पुरून उरत आहेत. संकटकाळात भारताला सतत साहाय्य करणारा हा नेता आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१२.१.२०२५)