‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे’ यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले अभिनव संशोधन !

‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे.

‘रामनाथी आश्रमात केलेल्या यज्ञांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर, एवढेच नव्हे, तर सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी आणि काही संतांनी सांगितले आहे. यासंदर्भात संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने एक अभिनव प्रयोग केला. हे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

१. रामनाथी आश्रमात २३.१.२०२२ या दिवशी झालेल्या गरुडयागाच्या वेळी सनातनचे दिवंगत २ साधक  आणि देहत्याग केलेले २ संत यांची छायाचित्रे संशोधनासाठी आश्रमातील ३ विविध ठिकाणी ठेवण्यात येणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून अनेक साधक जलद आध्यात्मिक प्रगती करत आहेत.  ‘सनातनच्या साधकांना मृत्यूत्तर महर्लाेक आणि सनातनच्या देहत्याग केलेल्या संतांना जनलोक, तपोलोक आदी उच्च लोकांची प्राप्ती झाली आहे. तसेच त्यांची पुढील साधना त्या त्या लोकांत चालू आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगी सांगितले आहे.

गरुडयागाच्या वेळी सनातनचे दिवंगत २ साधक आणि देहत्याग केलेले २ संत यांची छायाचित्रे संशोधनासाठी आश्रमात पुढील ठिकाणी ठेवण्यात आली.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या  goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

या प्रयोगातील साधक अन् संत यांच्या छायाचित्रांची यागापूर्वी आणि यागानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

सौ. मधुरा कर्वे

१. साधक अन् संत यांच्या छायाचित्रांमध्ये यागापूर्वी ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही आढळून आली.

२. यागानंतर साधक अन् संत यांच्या छायाचित्रांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

३. निष्कर्ष  

प्रयोगात ठेवलेल्या साधक अन् संत त्यांच्या छायाचित्रांवर गरुडयागातील चैतन्याचा पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. विशेष म्हणजे ही छायाचित्रे आश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवूनही त्या छायाचित्रांवर झालेल्या परिणामाचा कल (ट्रेंड) सारखाच आहे.

४. साधक अन् संत यांच्या छायाचित्रांवर गरुडयागातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम होण्याचे कारण :

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असते’, या तत्त्वानुसार साधक अन् संत यांच्या छायाचित्रांत त्यांची स्पंदने आहेत. ‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांपर्यंत हाेतो’, असे महर्षींनी सांगितले आहे. रामनाथी आश्रमात झालेल्या गरुडयागातून प्रक्षेपित झालेले चैतन्य सप्तलोकांतील जिवांनी सूक्ष्मातून ग्रहण केले. याचा परिणाम प्रयोगातील साधक अन् संत यांच्या छायाचित्रांवर प्रतिबिंबित झाला. त्यामुळे यागानंतर त्यांच्या छायाचित्रातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव संशोधन करण्याची संधी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांना मिळाली’, यासाठी आम्ही सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.२.२०२२)

ई-मेल : mav.research2014@gmail.com