Raipur Cow Slaughters Arrest : रायपूर (छत्तीसगड) येथे गोहत्या केल्याच्या प्रकरणी ८ मुसलमानांना अटक !
रायपूर – छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील मोमिनपारा भागात १ वर्षापासून अवैध गोहत्या आणि गोमांस विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिल्किस बानो आणि एरम जोहरा नावाच्या २ महिलांसह ८ मुसलमानांना अटक केली आहे. हिंदु संघटनांनी आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण समोर आले. आरोपींच्या घरात मोठ्या प्रमाणात गोमांस सापडले आहे. (हिंदु संघटनांनी मागणी करेपर्यंत न थांबता पोलिसांनी स्वत:हून या अवैध गोहत्या आणि गोमांस विक्री यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, अशीच सर्वसामान्य हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)
१. हिंदु संघटनांनी केलेल्या मागणीनंतर पोलिसांनी आरोपींच्या घरांवर धाड घातली. या धाडीत गोमांस, नायलॉन दोरी, लाकडी ठोकळा, कातडे, चाकू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींमध्ये बिल्किस बानो, एरम जोहरा, समीर, खुर्शीद अली, महंमद मुंतझीर हैदर, अशफाक अली, अरमान हैदर आणि महंमद इर्शाद कुरेशी यांचा समावेश आहे. या घटनेमुळे हिंदु संघटनांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या विरोधात ‘छत्तीसगड कृषक पशु संरक्षण कायदा, २००४’च्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाराज्यात गोहत्याविरोधी कायदा असतांना तेथे गोहत्या होते, याचा अर्थ मुसलमानांना त्या कायद्याचा भय नाही, असाच होतो ! या कायद्याची कठोर कार्यवाही करून गोहत्या करणार्यांना शिक्षा झाली, तरच त्यांच्यावर वचक बसेल ! |