ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम ‘प्रेमा’चे झणझणीत अंजन घालणारा ब्रिटीश लेखक डग्लस मरे !
संपूर्ण जग इस्लाममय करण्याची त्याची विषारी मानसिकता जगासमोर आणून ती रोखण्यासाठी भारतात ‘हिंदु राष्ट्र’ हवे !
गेल्या आठवड्यात डग्लस मरे या ब्रिटीश लेखकाचे ‘द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप’ हे पुस्तक वाचायला प्रारंभ केला. हे पुस्तक वाचत असतांना इंटरनेटवर डग्लस मरे यांच्याच ‘इस्लामोफिलिया’ (Islamophilia – इस्लामची आवड) या विचित्र नावाच्या पुस्तकाने लक्ष वेधून घेतले. ‘इस्लामोफिलिया’ वरवर पहात असतांना ते एवढे आवडले की, आधी तेच वाचून पूर्ण करायचे ठरवले. जगभरातील साम्यवादी पुरोगामी माध्यमे, तथाकथित इंटरनेटच्या माध्यमातून झालेले विद्वान (इंटरनेट इंटेलेक्च्युअल्स), हॉलीवूड इत्यादींमुळे आपण ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामविषयीची भीती) या शब्दाशी एव्हाना परिचित झालेलो असतो; पण हे इस्लामविषयीचे ‘फिलिया’ हा काय प्रकार आहे हे मला कळेना. फिलिया म्हणजे आवड. पुस्तकप्रेमींसाठी वापरली जाणारी संज्ञा म्हणजे ‘बिबलीयोफिलिया’ किंवा लहान मुलांची ‘आवड’ असणार्या आणि त्यांच्याकडे आकर्षित होणार्या प्रौढ लोकांसाठी वापरली जाणारी ‘पॅडोफिले’ ही संज्ञा ही याची काही उदाहरणे.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इस्लामोफोब’ म्हणजे काय ? अमेरिकेतील ‘इस्लामोफोबिया’विषयी पुस्तकात करण्यात आलेले भाष्य आणि ‘१००१ इस्लामी शोध’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून इस्लामचा तरुणांना आकृष्ट करणारा जिहाद’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/872503.html
७. ब्रिटन आणि युरोप येथे पाकिस्तानी ‘ग्रुमिंग गँग्ज’चे भीषण वास्तव आणि इस्लामची भयावहता
डग्लस मरे यांच्या ‘इस्लामोफिलिया’ या पुस्तकाला मेलनी फिलिप्स या अतिशय अभ्यासू ब्रिटीश पत्रकाराची प्रस्तावना लाभली आहे. याच काळात ब्रिटनमधील पाकिस्तानी ‘ग्रुमिंग गँग्ज’ (लव्ह जिहाद आणि बलात्कार करणार्या पाकिस्तानी नागरिकांच्या टोळ्या) अन् त्या विषयातील सरकारी पातळीवरची निष्क्रियता, ब्रिटनचे अनेक तत्कालीन मंत्री, त्याचप्रमाणे ‘ग्रुमिंग गँग्ज’च्या खटल्याच्या वेळी प्रमुख सरकारी अधिवक्ता असणारा आणि त्या वेळी ‘ज्याने हे प्रकरण जाणूनबुजून दाबून टाकले’, असे आणि आता चक्क ब्रिटनचे पंतप्रधान असणारे कीअर स्टार्मर अशा सर्वांवर सध्या इलॉन मस्क आपल्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरून टीकेची झोड उठवत आहेत. (‘एक्स’, म्हणजेच पूर्वाश्रमीचे ‘ट्विटर’ ‘वोक’ लोकांच्या कचाट्यातून बाहेर पडल्याचा परिणाम (वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !). या संदर्भातच आज यू ट्यूबवर ‘इस्लामोफिलिया’च्या डग्लस मरेचा एक ‘पॉडकास्ट’ समोर आला. त्यात डग्लस मरेने इस्लामचा युरोपमधील प्रसार, ‘ग्रुमिंग गँग्ज’ या सगळ्यांविरुद्ध लढणारा टॉमी रॉबिन्सन इत्यादींविषयी भाष्य केले आहे. डग्लस मरेच्या भाषणात २ मुद्दे मला विशेष महत्त्वाचे वाटले.
अ. पहिले म्हणजे डग्लस मरेने ऑक्सफर्डशरमधील अत्याचारी पाकिस्तानी टोळ्यांच्या तावडीतून महत्प्रयासाने सुटून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गुदरलेल्या भयावह प्रसंगाचे वर्णन केले आहे. ऑक्सफर्डशरमधील एका अनाथाश्रमातील मुलगी दुर्दैवाने या पाकिस्तानी टोळ्यांच्या तावडीत सापडली. त्या लोकांनी तिला बळजोरीने अमली पदार्थांचे सेवन करायला लावून अनेक दिवस तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. एक दिवस सुदैवाने ती त्यांच्या तावडीतून निसटली आणि कशीबशी ‘कॅब’ (चारचाकी वाहन) पकडून तिच्या अनाथाश्रमात आली; पण अर्थातच तिच्याकडे कॅबच्या भाड्याचे पैसे नव्हते. तिने अनाथाश्रमाच्या स्त्री (!!) अधिकार्याला भाड्याचे पैसे भरण्याची विनंती केली असता तिने ती विनंती सरळसरळ नाकारली. याच कालावधीत पाकिस्तानी टोळ्या तिला शोधत शोधत त्या अनाथाश्रमापर्यंत येऊन पोचल्या. आपल्या सावजाला तिथे पहाताच त्यांनी तिला तिथून पुन्हा उचलले आणि त्यांच्या अड्ड्यावर घेऊन गेले अन् तिच्या दुर्दैवाचे दशावतार पुढची कित्येक वर्षे असेच चालू राहिले. काही वर्षांनी या पाकिस्तानी टोळ्यांविरुद्ध खटला उभा राहून या घटनेचा उलगडा झाला असता अनाथाश्रमाच्या त्या असंवेदनशील, दायित्वशून्य आणि अकार्यक्षम स्त्री अधिकार्यामुळे त्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या स्त्रीने निगरगट्टपणे केवळ २ ओळीत दिलगिरी (क्षमा मागत) व्यक्त करून प्रकरण संपवले !
आ. दुसरा मुद्दा वेगळ्या प्रकारे महत्त्वाचा आहे. ब्रिटीश लोकांनी जेव्हा जगभरातील देशांना अंकित करत स्वतःच्या वसाहती त्या त्या ठिकाणी स्थापन करायला प्रारंभ केला, त्या वेळी तेथील तथाकथित मागासलेल्या लोकांच्या अंधःकारमय जीवनात आशेचे किरण फुलवण्याची, त्यांचे जीवन सुखकर करण्याचे दायित्व येशूने आपल्या सक्षम खांद्यांवर सोपवले असल्याच्या भ्रमात ते वावरत असत.
थोडक्यात ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी ‘त्या देशांची संस्कृती, व्यवहार, आचारविचार, देव, धर्म हे सगळे हीन प्रतीचे, अज्ञानमय, अंधःकारमय होते’, असा स्थानिक जनतेचा समज करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. (अर्थात् इस्लामच्या मतेही महंमद पैगंबराला प्रेषितत्व प्राप्त होण्यापूर्वीच काळ हा अंधःकारमय काळच समजला जातो). या ‘पॉडकास्ट’मध्ये एका प्रश्नाला उत्तर देतांना डग्लस मरे दुर्दैवाने हेच सत्य सांगतो; मात्र या वेळी ‘वोकिझम’च्या कृपेने ही परिस्थिती दस्तुरखुद्द ब्रिटनवर ओढवलेली आहे. गेली कित्येक वर्षे मिडियाच्या माध्यमातून ब्रिटनच्या नवीन पिढीसमोर त्याचा भूतकाळ अत्यंत मानहानीकारक रूपात मांडला जात आहे. म्हटले तर हा काव्यगत न्याय झाला; मात्र त्याच वेळी इस्लामच्या पोलादी पंज्यात एका माजी महासत्तेची मानगूट पकडली जात असून वेळीच जागृत न झाल्यास हा इस्लामरूपी दैत्य जगभरातील अन्य देशांना भक्ष्य करण्यात कुचराई करणार नाही, या भीषण सत्याची जाणीवही आपल्याला होते.
८. इस्लामचे विषारी सत्य आणि त्यांची मानसिकता सर्वांसमोर आणणे आवश्यक !
अर्थात् जगाला कह्यात घेऊन संपूर्ण जग इस्लाममय करण्याची इस्लामची विखारी मानसिकता ही जगभरातील ‘वोक’ नेत्यांच्या दृष्टीस पडत नसली, तरी स्वतः इस्लामने मात्र त्याच्या या विषारी लालसेचा छातीठोकपणे आणि निर्भयपणे वारंवार पुनरुच्चार केला आहे. इस्लामची असहिष्णुता, केवळ एकच देव, एकच प्रेषित मानण्याची आणि त्यामुळे इतर धर्म, पंथ, भाषा, देव, श्रद्धा यांना नाकारण्याची विषारी मानसिकता एव्हाना जगाला परिचित झालेली आहेच. कशाचाही काहीही उपयोग होत नाही, हेही एव्हाना आपल्याला ठाऊक झालेले आहे; पण तरीही कधी तरी, कुठे तरी एखादे पुस्तक वाचले जाते, एखादा व्हिडीओ, ‘पॉडकास्ट’ वगैरे बघितला जातो, त्यातील इस्लामचे विषारी सत्य पुन्हा एकदा सामोरे येऊन प्रचंड हतबलता येते आणि ती अशी लिखाणातून व्यक्त केली जाते. अर्थात् या व्यतिरिक्त आपल्या हातात दुसरे आहे तरी काय !
– श्री. हेरंब ओक, डोंबिवली. (८.१.२०२५) (समाप्त)