Jharkhand School Punishment To Girl Students : झारखंडमधील मिशनरी शाळेत ८० विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढून ‘ब्लेझर’ घालून घरी पाठवले !

  • शर्टवर पेनद्वारे लिखाण केल्याने शर्ट काढण्यात सांगितल्याचा दावा

  • जिल्हाधिकार्‍यांनी दिला चौकशीचा आदेश

(ब्लेझर म्हणजे शर्टच्या वर घालायचे जॅकेट)

प्रतिकात्मक छायाचित्र

धनबाद (झारखंड) – येथील कार्मेल शाळेत १० वीच्या ८० विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या आदेशावरून हे घडल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना शर्ट ऐवजी ‘ब्लेझर’ घालून घरी पाठवण्यात आले. ही घटना ९ जानेवारी २०२४ या दिवशी घडली. पालकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे आणि ‘शाळेत असे काहीही घडलेले नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. धनबादच्या आमदार रागिनी सिंह यांनीही याप्रकरणी शाळेवर टीका केली आहे.

दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थिनी ‘पेन डे’ (लेखणी दिन) साजरा करत होत्या आणि त्यांनी एकमेकांच्या शर्टवर पेनद्वारे मजकूर लिहिला होता. त्यामुळे त्यांना शर्ट काढण्यास सांगण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

संपादकीय भूमिका

मिशनरी शाळांमध्ये वाद का होतात, याचा विचार करता सरकारने त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवणारा विभाग स्थापन करणे आता आवश्यक झाले आहे !