शांत आणि समंजस असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. विश्वजा माने (वय १६ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. विश्वजा माने ही या पिढीतील एक आहे !
पौष शुक्ल द्वादशी (११.१.२०२५) या दिवशी कु. विश्वजा सतीश माने हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(‘वर्ष २०२२ मध्ये कु. विश्वजा सतीश माने हिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.’ – संकलक)
कु. विश्वजा सतीश माने हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. शांत आणि प्रेमळ
‘कु. विश्वजा नातेवाईक, तिचे वर्गशिक्षक आणि आमचे शेजारी यांची लाडकी आहे. ते सर्व जण म्हणतात, ‘‘विश्वजा समंजस, शांत आणि प्रेमळ आहे.’’ ती कुणाचेच मन दुखावत नाही. विश्वजाच्या वर्गातील मुलींमुळे काही वेळा विश्वजा दुखावली जाते, तरीही ती कुणालाच उलट बोलत नाही. ती त्या प्रसंगात शांतच रहाते. एकदा तिच्या वर्गशिक्षिका तिला म्हणाल्या, ‘‘मला तुझ्यासारखी मुलगी हवी होती.’’
२. ऐकण्याची वृत्ती
विश्वजाला कुठलेही काम सांगितले, तरीही ती करते.
३. राष्ट्रािभमान आणि धर्माभिमान
तिच्या शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना एक शिक्षिका एका जागी उभ्या न रहाता इकडे-तिकडे चालत असतात. तिने याविषयी संबंधित व्यक्तींना सांगितले. तिने १ जानेवारी या दिवशी कुणाकडूनही नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. तिने सर्वांना ‘गुढीपाडव्याच्या दिवशी शुभेच्छा द्या’, असे सांगितले.
४. चुकांविषयी संवेदनशील
एकदा ठाणे येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या सत्संगात तिला ‘या वर्षात साधनेचे काहीच प्रयत्न केले नाहीत’, याची जाणीव झाली. तेव्हा तिला पुष्कळ रडू आले. तिच्याकडून चूक झाल्यास मी तिला प्रायश्चित्त घ्यायला सांगते. तेव्हा ती प्रायश्चित्त घेते.
५. ती प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर करते. ती प्रत्येक रात्री नियमित भावजागृतीचे प्रयोग करते.
६. सेवाकेंद्रात जाण्याची ओढ
एकदा तिच्या शरिरावर लाल गांधी आल्या होत्या. तेव्हा तिला मरगळ येऊन झोपावेसे वाटत होते, तरीही ती तशीच सेवाकेंद्रात गेली. तेव्हा तिला शारीरिक त्रासाचे भान राहिले नाही. त्या दिवशी संध्याकाळी तिच्या केवळ पायावरच लाल गांधी होत्या.
– सौ. सारिका सतीश माने (कु. विश्वजाची आई), ठाणे (११.४.२०२४)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.