Ttp Kidnap Pakistan Scientists : ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ संघटनेने पाकिस्तानच्या १६ अणूशास्त्रज्ञांचे केले अपहरण !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानातील १६ अणूशास्त्रज्ञांचे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने अपहरण केले आहे. या संघटनेने या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी शास्त्रज्ञ शाहबाज, ‘तुम्ही आतंकवाद्यांच्या अटी मान्य करा आणि आमची त्यांच्या तावडीतून सुटका करा’, अशी सरकारला विनंती करतांना दिसत आहेत.
तालिबानच्या नेत्याने म्हटले आहे की, आम्ही या अणूशास्त्राज्ञांचे अपहरण त्यांना हानी पोचण्यासाठी नाही, तर आमच्या अटी मान्य करण्यासाठी केले आहे.
युरेनियमचीही लूट केल्याचा दावा
तालिबानकडून केवळ पाकिस्तानच्या अणूशास्त्रज्ञांचे अपहरण करण्यात आलेले नाही, तर पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या युरेनियमच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात युरेनियमची लूटही करण्यात आली आहे. या युरेनियमचा वापर अणूबाँब बनवण्यासाठी होतो.
संपादकीय भूमिकाअसे करून या संघटनेने पाकिस्तानच्या अब्रूची लक्तरेच अशा प्रकारे काढली आहेत. असा पाक भारतात आतंकवादी कारवाया करतो आणि भारत निष्क्रीय रहातो, त्यामुळेच त्याचे आतापर्यंत फावले आहे ! |