Mobile Ban In School : गुजरात सरकार शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाष यांच्या वाढत्या वापराविषयी मार्गदर्शक सूचना प्रसारित करणार
कर्णावती (गुजरात) – गेल्या काही वर्षांपासून देशभरातील मुलांमध्ये भ्रमणभाषची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे मुलांची अभ्यास करण्याची क्षमता, तसेच खेळांमधील रस अल्प होत आहे. देशात पहिल्यांदाच गुजरातमधील भाजप सरकार शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाष यांच्या वाढत्या वापराचा नकारात्मक परिणाम अल्प करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित करणार आहे.
📱🚫 Gujarat gov to issue guidelines on social media use in schools.📚
Mobile phones to be banned in primary schools. 🚫
A step towards healthier habits for kids!
It is necessary to give such an order for schools in all countries
PC: @DeccanHerald pic.twitter.com/Kb9w9Ayv8u
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 10, 2025
प्राथमिक शाळांमध्ये मुलांसाठी भ्रमणभाषवर बंदी
शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी पत्रकारांना सांगितले की, मुलांना भ्रमणभाषपासून दूर ठेवणे आणि त्यांना खेळाच्या मैदानावर आणणे अन् त्यांचा अभ्यासाकडे कल वाढवणे, हा यामागील उद्देश आहे. तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. आम्ही यापूर्वी प्राथमिक शाळांमध्ये मुलांसाठी भ्रमणभाषवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. आतापासून या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
संपादकीय भूमिकासर्व देशांतील शाळांसाठी असा आदेश देणे आवश्यक आहे ! |