CM Yogi Adityanath : ज्यांचे पूर्वच हिंदु होते आणि आता सनातन परंपरांवर श्रद्धा आहे, अशा मुसलमानांचे महाकुंभामध्ये स्वागत आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

  • उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती

  • चुकीचे कृत्य करणार्‍यांना धडा शिकवण्यात येण्याचेही केले स्पष्ट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – स्वतःला भारतीय समजणार्‍यांचे महाकुंभामध्ये स्वागत आहे. सनातन परंपरेवर विश्‍वास ठेवणार्‍यांना असे वाटते की, त्यांच्या पूर्वजांनी पूर्वी कोणत्या ना कोणत्या दबावाखाली इस्लाम स्वीकारला होता; पण ते सनातनी आहेत. जे मुसलमान त्यांचे गोत्र भारतातील ऋषींच्या नावांशी जोडतात, अशा लोकांनी प्रयागराजला यावे. येथे येऊन पारंपरिक पद्धतीने संगमात स्नान करावे. असे लोक यायला हरकत नाही, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा मानसिकतेच्या लोकांना महाकुंभामध्ये प्रवेशबंदी नसल्याचे स्पष्ट केले. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने कुंभस्थळी घेतलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. मुख्यमंत्र्यांनी ‘चुकीची मानसिकता घेऊन येणार्‍यांचे ‘डेंट’ आणि ‘पेंट’ करण्याचीही (धडा शिकवण्याचीही) व्यवस्था करण्यात आली आहे’, असेही या वेळी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

ज्यांचे पूर्वज हिंदु होते आणि ज्यांची सनातन परंपरांवर श्रद्धा आहे अन् त्यांना हिंदु धर्मात परत यायचे असेल, अशांसाठीही सरकारने योजना आखली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !