Varanasi Siddheshwar Temple : वाराणसीतील मुसलमानबहुल भागातील बंद सिद्धेश्वर मंदिर उघडले !
पूजा पूर्ववत् चालू !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीतील मुसलमानबहुल मदनपुरा परिसरात अनेक दशकांपासून बंद असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार नुकतेच उघडण्यात आले. या मंदिराच्या आत शिवलिंग आहे. हे मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी स्थानिक हिंदू अनेक दिवसांपासून निदर्शने करत होते. या मंदिरात पूजा चालू करण्यात आली आहे. प्रशासनाने सांगितले की, मंदिराच्या जवळील हिंदु व्यक्तीचे घर वर्ष १९९२ मध्ये एका मुसलमान व्यक्तीला विकण्यात आले होते. ज्या भागात हे मंदिर आहे, तिथे विणकरांची वस्ती आहे आणि त्यांपैकी बहुतेक मुसलमान आहेत.