Hindu Heritage Month : अमेरिकेच्या ओहायो राज्यात ऑक्टोबर महिना ‘हिंदु वारसा महिना’ म्हणून साजरा होणार !

कोलंबस (अमेरिका) – अमेरिकेच्या ओहायो राज्याचे गव्हर्नर माइक डेविन यांनी ऑक्टोबर महिना ‘हिंदु वारसा महिना’ म्हणून घोषित करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. आता ऑक्टोबर महिना या राज्यात ‘हिंदु वारसा महिना’ म्हणून साजरा केला जाईल. नुकतीच माजी राज्य सिनेटर नीरज अंतानी यांच्या उपस्थितीत डेविन यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. गेल्या वर्षी या कायद्याचे मुख्य प्रायोजक आणि समर्थक नीरज अंतानी होते.

डिसेंबर २०२४ मध्ये ओहायो स्टेट हाऊस आणि सिनेट यांनी हे विधेयक संमत केले होते. हे विधेयक आता अधिकृतपणे कायद्यात रूपांतरित झाले आहे आणि ९० दिवसांत ते लागू होईल. ऑक्टोबर २०२५ हा ओहायोचा पहिला अधिकृत ‘हिंदु वारसा महिना’ असेल. नीरज अंतानी हे ओहायोमधील पहिले हिंदु आणि भारतीय अमेरिकन राज्य सिनेटर आहेत.