Keshav Prasad Maurya On Mahkumbh : महाकुंभाची सिद्धता पूर्ण क्षमतेने चालू !

  • उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची सनातन प्रभातला माहिती

  • ‘अक्षय पात्र फाउंडेशनच्या’ प्रतिदिन ३० सहस्र भाविकांना महाप्रसाद देण्याच्या सुविधेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य

प्रयागराज, १० जानेवारी (वार्ता.) – महाकुंभाची सिद्धता अतिशय जोरात चालू आहे. महाकुंभाला ४० ते ५० कोटी लोक येण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्वागतासाठी ‘अतिथी देवो भव’ या भावाने जे आवश्यक आहे, ते सर्व करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे उद्गार उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी येथे ‘सनातन प्रभात’शी बोलतांना काढले. इस्कॉनशी संबंधित ‘अक्षय पात्र फाउंडेशन’च्या महाकुंभ अन्नदान सेवेचे उद्घाटन करण्यासाठी ते कुंभनगरी प्रयागराज सेक्टर ६ येथील फाउंडेशनच्या स्वयंपागृहात आले होते. ‘अक्षय पात्र फाउंडेशन’च्या या आणि अन्य स्वयंपाकगृहांद्वारे एकूण ३० सहस्र भाविकांना प्रतिदिन महाप्रसाद दिला जाणार आहे.

अक्षय पत्र फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष भरातर्षभा दास यांनी या सेवेविषयी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पूर्ण कालावधीत किमान १० ते १५ लाख लोकांना अन्नदान देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. यासाठी विविध मोठे देणगीदार यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य करण्याचे घोषित केले आहे.