Indian Culture Through Paintings In Mahakumbh : कुंभक्षेत्रात ३५ लाख चौरस किलोमीटर भिंतीवर चित्रांद्वारे भारतीय संस्कृती साकारण्याचा विश्वविक्रम !
प्रयागराज, १० जानेवारी (वार्ता.) – उत्तरप्रदेश शासनाकडून महाकुंभक्षेत्रात रस्त्याच्या दुतर्फा तब्बल ३५ लाख चौरस किलोमीटर भिंतींवर चित्रांद्वारे भारतीय संस्कृती साकारण्याचा विश्वविक्रम केला आहे. गुरु-शिष्य परंपरा, भारतातील ऋषी-मुनी, प्रयागराजचा इतिहास, मंदिर संस्कृती, गोमातेचे महत्त्व, आखाड्यांची माहिती, रामायण-महाभारत यांतील कथा, समुद्र मंथन आदी विविध चित्रे भिंतींवर साकारण्यात आली आहेत. ही सर्व चित्रे अतिशय अप्रतिम असून लक्षवेधी ठरत आहेत. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या अर्धकुंभमेळ्यामध्ये १५ लाख चौरस किलोमीटर भिंतींवर अशा प्रकारे चित्रे साकारण्यात आली होती. उत्तरप्रदेशमधील चित्रकार, महाविद्यालयांतील विद्यार्थी यांनी ही चित्रे साकारली आहेत.