उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षणगृहातून ८ मुलींचे पलायन !
७ मुली सापडल्या
कल्याण – उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षण गृह आणि विशेष गृहातील १५ ते १७ वयोगटातील ८ मुली सकाळी शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पळून गेल्या. ही माहिती निरीक्षण गृहातील कर्मचार्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी शोध मोहीम राबवून उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातून ७ अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले. एक अल्पवयीन मुलगी अद्याप सापडलेली नाही. तिचा शोध चालू आहे.
‘या मुलींना निरीक्षण गृहातील सेवासुविधा आवडत नसल्याने आणि मनाप्रमाणे रहाता येत नसल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला’, असे अधिकार्याने सांगितले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.