Shocking Remarks By SC Justice : सर्वोच्च न्यायालयासारखे बेशिस्त न्यायालय कधी पाहिले नाही !

सुनावणीच्या वेळी आरडाओरड करणार्‍या अधिवक्त्यांवरून संतप्त झालेल्या न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांची टिप्पणी

न्यायमूर्ती बी.आर्. गवई

नवी देहली – मी मुंबई उच्च न्यायालय, तसेच नागपूर आणि छत्रपती संभाजीगर खंडपिठात न्यायाधीश म्हणून काम केले आहे; पण सर्वोच्च न्यायालयासारखे शिस्तीचा अभाव असणारे न्यायालय मी कुठे पाहिले नाही. येथे एका बाजूला ६ आणि दुसर्‍या बाजूला ६ अधिवक्ते एकमेकांवर ओरडत असतात. उच्च न्यायालयातही असा प्रकार झाल्याचे मी कधी ऐकले नाही. त्यामुळे सर्व अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आदर करावा, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांनी एका सुनावणीच्या वेळी केली. या वेळी दोन्ही बाजूच्या अधिवक्त्यांनी आरडाओरडा चालू केला होता. त्यामुळे न्यायमूर्ती गवई यांनी वरील विधान केले.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीही न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांनी अशीच टिप्पणी केली होती. ‘आमच्यापैकी जे लोक उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात येतात, त्यांना येथे शिस्तीचा अभाव जाणवतो. येथे कुणीही कधीही बोलू शकतो. व्यवस्थेचा अभाव यात स्पष्ट प्रतीत होतो’, असे ते म्हणाले होते.

संपादकीय भूमिका

केवळ उच्चशिक्षित झाल्यामुळे कुणी सुसंस्कृत आणि आदर्श होत नाही, हे यातून लक्षात येते ! यासाठी शिक्षणामध्ये साधना शिकवणेही आता महत्त्वाचे आहे. साधना समजून ती करणारी व्यक्ती सुसंस्कृत आणि नीतीनियम यांचे पालन करणारी होते !