केरी, पेडणे येथील अनधिकृत ‘शॅक’ व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश
पेडणे, ९ जानेवारी (वार्ता.) – केरी, पेडणे येथील समुद्रकिनार्यावर पर्यटन खात्याने स्थानिक बेरोजगार तरुणांना ‘शॅक’ व्यवसाय चालू करण्यासाठी अनुज्ञप्ती दिली आहे; मात्र स्थानिकांच्या ‘शॅक’च्या बाजूला मोठ्या प्रमाणात ‘शॅक’ व्यवसाय चालू आहे, तसेच त्या ठिकाणी लाकडी खाटा घालून अतिक्रमण करण्यात आले आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी विलास आरोलकर यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यावर न्यायालयाने अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे, तसेच पर्यटन खात्याने स्थानिक तरुणांना ‘शॅक’ व्यवसायासाठी परवाने दिले आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण करू नये, अशी सूचना केली आहे.
याचिकेत विलास आरोलकर यांनी अनधिकृत व्यवसाय करणार्यांमुळे शासनाला कोणताही प्रकारचा महसूल मिळत नाही; मात्र कायदेशीररित्या व्यवसाय करणार्यांना यामुळे आडकाठी निर्माण होते, असे याचिकेत म्हटले होते.
संपादकीय भूमिकापोलिसांना आणि पर्यटन खात्याला हे अनधिकृत व्यवसाय का दिसत नाहीत ? यासाठी स्थानिक शॅकचालकांना न्यायालयात जावे लागणे संबंधितांना लज्जास्पद ! |