‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

पुणे – महाराष्ट्र शासन ‘गोसेवा आयोगा’च्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे (प्रकल्पाची माहिती असणारा दस्तऐवज) राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवनामध्ये प्रकाशन करण्यात आले, अशी माहिती पशूसंवर्धन सहआयुक्त तथा आयोगाच्या सदस्या सचिव डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी दिली. या वेळी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

या वेळी राज्यपालांनी गो आधारित कृषीसाठी राज्य सरकार आणि गोसेवा आयोग यांच्याकडून निर्णायक अन् परिणामकारक कार्य व्हावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गोसेवा आयोगाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचेही त्यांनी कौतुक करत आयोगाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.