राजस्थानात तरुणांनी सायबर फसवणुकीसाठी वापरलेले ३०० भ्रमणभाष गावकर्यांनी फोडून जाळले !
|
जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या डीग क्षेत्रातील पालडी गावात ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी लहान मुले आणि युवक यांनी लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी खरेदी केलेले ३०० भ्रमणभाष (मोबाईल) आणि सिमकार्ड त्यांच्याकडून हिसकावून घेतले. त्यानंतर ते सर्व भ्रमणभाष फोडून जाळून टाकले. लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावाचे आदर्श गावात रूपांतर करू, असा संदेश ज्येष्ठांनी या कृतीतून दिला आहे. ज्येष्ठांनी सांगितले की, गावात एक पथक स्थापन केले जाईल. ते गावातील लहान मुले किंवा युवक यांच्याकडून झालेल्या फसवणुकीविषयी माहिती गोळा करील आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करील. अनेक गावांतील ज्येष्ठांनी तरुणांना सायबर फसवणूक न करण्याची शपथ दिली.
१. ‘राजस्थान पत्रिका’चे ‘ऑपरेशन रक्षाकवच’ आणि भरतपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राहुल प्रकाश यांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे डीग परिसरातील गावांमध्ये सायबर फसवणूक करणार्यांचा निषेध चालू झाला आहे.
२. भरतपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार पोलिसांचे पथक सायबर गुन्हेगारांवर कडक कारवाई करत आहे. अनेक जण कारागृहात पोचले आहेत.
३. तरुणांना सायबर गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी गावातील ज्येष्ठांनी मोहीम चालू केली आहे. आता या गावांमध्ये सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
संपादकीय भूमिकाफसवणूक न करण्याची शपथ देण्यासोबतच मुलांना ‘साधना’ शिकवल्यास ते अशा प्रकारच्या गुन्हेगारीकडे वळणारच नाहीत ! |