वही हरवणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण !

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील घटना

सौजन्य : न्यूज 18 लोकमत

नाशिक – येथे इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने वही हरवली; म्हणून शिक्षकाने त्याला अमानुष मारहाण केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. छडीने मारहाण केल्याने त्याच्या पाठीवर बरेच वळही उठले. मुलाच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून ‘विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणार्‍या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.


मुख्याध्यापकांकडून ७ वीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण !

जालना – येथे शहागड जिल्हा परिषदेच्या शाळेत ७ वीतील विद्यार्थ्याला ९ वीच्या वर्गात बसल्या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने लिंबाच्या काठीने अमानुष मारहाण केली. विद्यार्थ्याच्या मांडीवर आणि पायावर काठीचे वळ उठले असून सूज आली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. या प्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या पालकांनी केली होती. या प्रकरणी मुख्याध्यापक खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

असे शिक्षक, मुख्याध्यापक यांना बडतर्फच करायला हवे !