गडचिरोली येथे दोन जहाल महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करली !
गडचिरोली – येथील दोन जहाल महिला माओवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यासमोर शरणागती पत्करली. शामला झुरू पुडो उपाख्य लीला (वय ३६ वर्षे) आणि काजल मंगरू वड्डे उपाख्य लिम्मी (वय २४ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. शामलावर आजपर्यंत एकूण ४५ गुन्हे नोंद असून त्यामध्ये २१ चकमक, ६ जाळपोळ आणि १८ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. काजलवर ८ गुन्हे नोंदवलेले असून त्यामध्ये ४ चकमकी, १ जाळपोळ आणि ३ इतर गुन्हे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने शामलावर ८ लाख रुपयांचे, तर काजलवर २ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते.
गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबवल्याने, तसेच शासनाने माओवाद्यांना शरणागतीची संधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी आतापर्यंत एकूण ४६ जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली.’