नामजपाची आवड असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उरण (जिल्हा रायगड) येथील कु. प्रार्थना योगेश ठाकूर (वय ६ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. प्रार्थना योगेश ठाकूर ही या पिढीतील एक आहे !
पौष शुक्ल एकादशी (१०.१.२०२५) या दिवशी कु. प्रार्थना ठाकूर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. प्रार्थना ठाकूर हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. सात्त्विकतेची आवड
‘कु. प्रार्थना ३ वर्षांची असतांना पाळण्यातील हनुमानाच्या मूर्तीकडे पाहून खेळत असे. ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र एकटक पहात असे. ‘जणू काही ती त्यांना ओळखते’, असे आम्हाला वाटत असे.
२. घरकामात साहाय्य करणे
प्रार्थना आम्हाला घरकामात साहाय्य करते, उदा. कपड्यांच्या घड्या घालणे, केर उचलणे, स्वतःचा चहाचा पेला आणि जेवणाचे ताट नेऊन ठेवणे, इतरांना पाणी देणे.
३. शिक्षकांशी जवळीक असणे
ती बालवाडीत शिकत आहे. ती वर्गातील अन्य मुलांकडे लक्ष देते आणि त्यांना शिकवते. प्रार्थना शाळेत गेली नाही, तर तिच्या शिक्षिका तिची विचारपूस करतात.
४. व्यवस्थितपणा
प्रार्थनाला तिच्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आवडतात. एखाद्या वेळी तिच्या वस्तू अव्यवस्थित ठेवल्या गेल्यास ती लगेचच वस्तू व्यवस्थित करून ठेवते.
५. चांगली आकलनक्षमता
प्रार्थनाला आरत्या आणि श्लोक म्हणायला अन् शाळेतील अभ्यास करायला पुष्कळ आवडतो. तिच्या वयाच्या मानाने तिची आकलनक्षमता चांगली आहे.
६. धर्माचरणाची आवड
प्रार्थनाला कुंकू लावायला आणि सात्त्विक पोशाख घालायला आवडते. ती संध्याकाळी शुभंकरोती म्हणते.
७. धर्माभिमान
तिला देवतांविषयी पुष्कळ आदर आहे. एकदा आम्ही तिला ‘हलाल जिहाद’विषयी सांगितले. आम्ही एखादी वस्तू विकत घेत असतांना ती विचारते, ‘‘ही वस्तू हलाल प्रमाणित (टीप) तर नाही ना.’’ (टीप – हलाल जिहाद : भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ आणि वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल प्रमाणित’ असण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी विविध आस्थापनांना ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य केले जाऊ लागले आहे. ‘हलाल’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो.)
८. नामजपाची आवड
ती प्रतिदिन वहीत २ पाने नामजप लिहिते.
९. चुकांविषयी संवेदनशील
तिच्याकडून चूक झाल्यास ती लगेच कान पकडून क्षमा मागते. घरातील व्यक्ती मोठ्याने ओरडल्यास किंवा बोलल्यास प्रार्थना त्यांना चुकीची जाणीव करून देते.
१०. गुरु आणि देव यांच्याप्रती भाव
ती म्हणते, ‘‘मी रामनाथीला डॉक्टरबाबांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) सेवा करीन.’’ तिला कुणी पैसे दिल्यास ती मला ‘ते पैसे डॉक्टरबाबांना अर्पण कर’, असे सांगते. तिला ‘डॉक्टरबाबा म्हणजे सर्वकाही’, असे वाटते. ती रात्री झोपतांना शेजारी श्रीकृष्णाचे चित्र ठेवते. तिला तिच्या हृदयात हनुमंत दिसतो.’
– सौ. वर्षा ठाकूर (कु. प्रार्थनाची आई) आणि श्री. योगेश ठाकूर (कु. प्रार्थनाचे वडील), उरण, जिल्हा रायगड. (२७.११.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.