Tirupati Temple Stampede : तिरुपती मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण ६ जणांचा मृत्यू
तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथे ८ जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजता श्री तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट खिडकीजवळ झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेसह ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले. १० जानेवारीपासून १० दिवसांसाठी प्रारंभ होणार्या विशेष वैकुंठ द्वार दर्शनासाठी तिकिटांचे वाटप चालू होते. यासाठी मंदिर समितीने ९१ तिकीट खिडक्या उघडल्या होत्या. घटनेच्या वेळी येथे सुमारे ४ सहस्रांहून अधिक भाविकांची गर्दी होती. त्या वेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेवर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घायाळांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंदिर समितीच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिकिटासाठी वैकुंठ दारावर गर्दी जमलेली होती. पोलिसांनी भाविकांना बैरागी पट्टिडा पार्कवर रांगा लावण्यास सांगितले. वैकुंठ दाराबाहेरून जमाव उद्यानाकडे धावला. त्यामुळे एकच धावपळ चालू झाली. लोक एकमेकांवर पडले. यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकामंदिरांच्या ठिकाणी सातत्याने होणार्या अशा घटना थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे ! |