Prayagraj Kumbh Parva 2025 : सनातन धर्माला उच्च स्थानावर नेण्यासाठी गंगामातेला प्रार्थना करू ! – पू. रामकिशोरदास शास्त्री महाराज, श्री महंत, दिगंबर आखाडा
प्रयागराज कुंभपर्व २०२५
प्रयागराज, ९ जानेवारी (वार्ता.) – अखिल भारतीय तिन्ही आखाड्यांनी सामुहिकरित्या ८ जानेवारी या दिवशी कुंभक्षेत्रात प्रवेश केला आहे. यामध्ये श्री महंत, आचार्य महामंडलेश्वर, जगद्गुरु शंकराचार्य यांचाही समावेश आहे. यामध्ये खालसा आखाड्यांचाही समावेश आहे. सनातन धर्माला विश्वात उच्च स्थानावर नेण्यासाठी आम्ही गंगामातेच्या चरणी प्रार्थना करणार आहोत. हा मेळा निर्विघ्नपणे पार पाडावा. यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठीही आम्ही गंगामातेला प्रार्थना करणार आहोत. कुंभमेळ्यामध्ये भागवत कथा, रामायण कथा, विविध यज्ञ अनुष्ठान यांद्वारे सनातन धर्माच्या प्रचार-प्रसाराचे कार्य केले जाणार आहे, अशी माहिती दिगंबर आखाड्याचे महंत पूजनीय रामकिशोरदास शास्त्री महाराज यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.