महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्यासाठी अध्यादेश काढावा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन
सांगोला (जिल्हा सोलापूर),– ८ जानेवारी (वार्ता.) – देवस्थानच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात ‘लँड ग्रॅबिंग’द्वारे अवैधरित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले. भूमी हडपणार्यांविरोधी विशेष पथकाची नेमणूक करावी, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघ शाखा सांगोलाच्या वतीने ध्यानमंदिराचे श्री. विठ्ठल गोडसे, गोडसेवाडी येथील दत्त मंदिराचे श्री. श्रीकांत देशपांडे, व्यंकटेश मंदिराचे श्री. ऋषिकेश पुजारी, सटवाई मंदिराचे श्री. उत्तम जाधव, महुद येथील विठ्ठल मंदिराचे श्री. शंकर महादेवकर, दत्त मंदिराचे श्री. सुभाष लउळकरसर, पुरोहित श्रीपाद वांगीकर, डॉ. मानस कमलापूरकर, सर्वश्री उदय पुजारी, नवनाथ कावळे, चेतन बुरंगे, दत्तात्रय शिंदे, संतोष पाटणे, श्रेयश तोडकरी आदी उपस्थित होते.