पुणे येथील आक्रमण झालेल्या शुभदा कोदारेचा मृत्यू !
पैशांच्या वादातून सहकार्यानेच वार केल्याचे उघड !
पुणे – येथील नामांकित आयटी आस्थापनाच्या वाहनतळामध्ये आक्रमण झालेल्या शुभदा कोदारे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या सहकार्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केले होते. यात तिचा उजवा हात पूर्णपणे निखळला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाली. ७ जानेवारीला सायंकाळी आस्थापनाच्या वाहनतळामध्ये ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजा याला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :अशांना कठोर शिक्षाच हवी ! |