अमेरिकेत तरुण आणि अविवाहित पुरुष यांच्यामध्ये कर्मठ चर्चकडे जाण्याचा वाढता कल !

वॉशिंग्टन – अमेरिकेत तरुण आणि अविवाहित पुरुष यांच्यामध्ये कॅथॉलिक किंवा प्रोटेस्टंट चर्च टाळून रूढीवादी ख्रिस्ती चर्च (ऑर्थोडॉक्स चर्च) येथे जाण्याकडे  तरुण आणि अविवाहित पुरुष यांचा कल वाढत आहे. कोरोना महामारीनंतर याचे प्रमाण वाढले आहे. महामारीच्या वेळी ऑनलाइन सामग्रीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे तरुणाईला धर्माविषयी त्यांची मानसिकता पालटण्यात साहाय्य झाले आहे.

१. रूढीवादी चर्चमध्ये दीर्घ प्रार्थना, उपवास आणि आत्मसंयम यांवर भर दिला जातो. या चर्चमध्ये घंटोन्घंटे प्रार्थना चालतात आणि ४० दिवसांपर्यंतचे उपवासही ठेवले जातात. रूढीवादी चर्चमध्ये होणारे शिस्तीचे पालन, तसेच तेथील पाद्य्रांमध्ये असलेली क्षमता यांमुळे तरुण चर्चकडे आकर्षित होत आहेत.

२. ‘ऑर्थोडॉक्स स्टडीज इन्स्टिट्यूट’द्वारे केलेल्या एका सर्वेक्षणानुसार वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२२ मध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी रूढीवादी चर्चमध्ये दीक्षा घेतली. वर्ष २०१९ मध्ये हे प्रमाण ५४ टक्के होते.