B’desh Hindu Youth Hacked To Death : बांगलादेशात हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या !

कॉक्स बाजारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार !

सुदेव हलदर या २८ वर्षीय हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या

कॉक्स बाजार (बांगलादेश) : येथे सुदेव हलदर या २८ वर्षीय हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला. सुदेव हिंदू असल्याने त्याची हत्या करण्यात आली. ही घटना रामपूर जोरापोल परिसरात घडली.

दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीवर ८ ते १० जणांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला रस्त्यावर सोडण्यात आले. तिच्यावर बलात्कार करणार्‍यांचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुदेव हलदर हा बावकाठी मार्केटमध्ये भ्रमणभाषचे दुकान चालवायचा. पोलिसांनी सांगितले की, सुदेव दुकान बंद करून घरी परतत असतांना वाटेत अज्ञातांनी त्यांची गळा चिरून हत्या केली. स्थानिक लोक आणि त्याचे कुटुंबीय यांना घरापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या शेतात सुदेवचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. सुदेवचे वडील सुबोध हलदर म्हणाले की, माझ्या मुलाचे कुणाशीही वैर नव्हते. माझ्या मुलाला कुणी आणि का मारले ? हे मला समजत नाही. पोलिसांनी सत्य उघड करावे आणि मारेकर्‍यांविरुद्ध कारवाई करावी, अशी माझी इच्छा आहे.

हिंदूंनी देश सोडून जाण्यासाठी हिंदूंच्या हत्या ! – बंगबंधू प्रकाशोली परिषद

बंगबंधू प्रकाशोली परिषदेचे सचिव सुशांत दासगुप्ता

बंगबंधू प्रकाशोली परिषदेचे सचिव सुशांत दासगुप्ता म्हणाले की, बांगलादेशात प्रतिदिन कुठे ना कुठे हत्या होत आहेत. तो हिंदू होता म्हणून त्याला मारण्यात आले, असे आमचे मत आहे. अशा प्रकारे हिंदूंची हत्या करून ‘हा बांगलादेश हिंदूंचा नाही’, असा संदेश दिला जात आहे. हिंदूंना घाबरवण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली जेणेकरून ते बांगलादेश सोडून जातील.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होणे कुणीच थांबवू शकत नाहीत, असेच चित्र दिसते, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !