लेखक दत्ता नायक यांचा अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज
|
मडगाव, ८ जानेवारी (वार्ता.) – मठ आणि मंदिरे यांना ‘लुटारू’ संबोधून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गोव्यातील लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात काणकोण, मडगाव, तसेच अन्य पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. पर्तगाळी, काणकोण येथील श्री संस्थान पर्तगाळ मठाचे अनुयायी सतीश भट यांनी काणकोण पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी दत्ता नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे दत्ता नायक यांनी मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
१. गोवा मंदिर महासंघ आणि मडगाव परिसरातील काही मंदिरांचे प्रतिनिधी यांनी त्यांच्याविरुद्ध मडगाव शहर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केली आहे.
२. वास्को आणि डिचोली येथील पोलीस ठाण्यांमध्ये दत्ता नायक यांच्या विरुद्ध तक्रारी प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत.
३. दत्ता नायक यांनी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या जामीन अर्जावर ९ जानेवारी या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.