अमेरिकेच्या आजच्या प्रगतीत अनिवासी भारतियांचे योगदान मोठे !

सत्या नाडेला

वर्ष २०१४ मध्ये जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट कंपनी’ डबघाईला आली होती. त्यांनी घेतलेले प्रकल्प तोट्यात होते. भांडवल होते जेमतेम ३ अब्ज (२५ सहस्र २०० कोटी रुपयांहून अधिक) डॉलर. मग या आस्थापनात एका भारतियाचा प्रवेश होतो, त्यांचे नाव सत्या नाडेला ! आआस्थापनाचे भाग्य पालटते. आज आस्थापनाची उलाढाल आहे ३ ट्रिलियन डॉलर (एकावर १२ शून्य). हाच प्रकार तेथील इतर आस्थापनांविषयीही घडला आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

आज ५०० युनिकॉर्न (१ अब्ज रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या) आस्थापनांपैकी ९० भारतियांनी स्थापन केल्या आहेत. त्या खालोखाल इस्रायल ५०, तर कॅनडा ४० वा क्रमांक येतो. अमेरिकेच्या आजच्या प्रगतीत अनिवासी भारतियांचे योगदान मोठे आहे.


‘आयफोन’चे उत्पादन भारतात !

६ अब्ज डॉलरचे (५० सहस्र कोटी रुपये) ‘आयफोन १६’चे भ्रमणभाष संच बनले भारतात ! हेच आयफोन भारतातून जगाला निर्यात होणार. ते पूर्वी चीनमध्ये बनायचे आणि आता त्यांचे उत्पादन भारतात होत आहे. ‘सॅमसंग’ आस्थापनानेही त्यांचा चीनमधील सर्वांत मोठा प्रकल्प बंद करून भारतात स्थलांतरित केला आहे.


संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ (भारतात उत्पादन करणे)ला मोठे यश !

भारतात पहिल्यांदाच होणार सामरिक मालवाहू विमानाची निर्मिती ! या लष्करी मालवाहू विमानाचे नाव असेल ‘सी २९५’. भारतातील ‘टाटा’ आणि स्पेनचे ‘एअर बस’ आस्थापन यांचा संयुक्त प्रकल्प बडोद्यात (गुजरात), म्हणजेच भारतात पहिल्यांदाच होणार खासगी आस्थापनात विमानाची निर्मिती ! भारत ‘एअर बस’कडून ५६ विमाने खरेदी करणार, त्यापैकी १६ ‘एअर बस’कडून प्रत्यक्ष खरेदी, तर ४० चे उत्पादन भारतात होणार. भारत या विमानांची निर्यातही करू शकेल.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (७.१.२०२५)