सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहून प्रभावित झालो ! – महंत भगवतीगिरिजी, गुजरात
महाकुंभ २०२५
प्रयागराज – सनातन संस्थेेच्या प्रदर्शन कक्षाच्या बाहेरील गुरु-शिष्याचा फलक पाहून मी त्याकडे आकर्षित झालो. प्रदर्शन पाहिल्यावर मी पुष्कळ प्रभावित झालो. सनातन धर्माचे जे काही कार्य तुम्ही करत आहात, ते अत्यंत आवश्यक आहे, हीच आपली संस्कृती आहे. सनातन धर्माचे रक्षण झाले पाहिजे. तुमच्या कार्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत, असे उद्गार गुजरात येथील महंत भगवतीगिरिजी महाराज यांनी कुंभनगरी प्रयागराज येथील सनातन संस्थेच्या ‘मोरी मुक्ती मार्ग’ येथील प्रदर्शनस्थळाला भेट दिल्यावर काढले.
महंत भगवतीगिरिजी पुढे म्हणाले की, तुमच्या आदरणीय गुरुजींविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) मी आदर व्यक्त करतो. मी हिंदूंना आवाहन करतो की, सनातन धर्माचे हे कार्य करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. संस्थेच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे, त्यासाठी हातभार लावावा. आपल्या संस्था वेगळ्या असल्या, तरी हिंदु धर्माच कार्य, हे एकच लक्ष्य आहे, हे लक्षात घ्यावे. सध्या लोक पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळत आहेत, असे असतांना लोकांना धर्मशिक्षण देण्याचे तुमचे कार्य स्तुत्य आहे.