संपादकीय : ‘रिव्हॉल्वर’ दादी ! 

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे

उत्तरप्रदेशातील कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे या ‘रिव्हॉल्वर दादी’ (रिव्हॉल्वर आजी) म्हणून ओळखल्या जातात. पूर्वी कधी तरी त्यांनी रिव्हॉल्वर हातात घेऊन काढलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. त्यानंतर त्यांना हे विशेषण जोडले गेले; मात्र त्यांना हे बिरूद लावण्यात एवढेच कारण पुरेसे नाही. प्रमिला पांडे या खमक्या राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रशासनावर पकड आहे. ‘आता वेळ नाही, नंतर काम करतो’, अशी अधिकार्‍यांकडून देण्यात येणारी कारणे त्यांना चालत नाहीत. अशांना त्यांनी सुतासारखे सरळ केले आहे. पावसाळ्याआधी नाले स्वच्छतेच्या कामात दिरंगाई झाली. त्यावर अधिकार्‍यांनी त्यांच्यासमोर घुमजाव केल्यावर प्रमिलाताईंनी अधिकार्‍याच्या अंगावर थेट फाईल फेकली. ‘गटारांची वेळेत स्वच्छता न झाल्यास पावसात शहर तुंबले, तर तुमची खैर नाही’, असा दम द्यायलाही त्या विसरल्या नाहीत. याचे विरोधकांनी भांडवल केल्यावर त्यांच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचवून प्रमिलाताईंनी त्यांनाही गप्प केले. त्या कार्यालयात अल्प आणि रस्त्यावर कामे करतांना अधिक दिसतात. विकासकामांमध्ये कुठे काही दिरंगाई होत असल्यास त्या थेट कार्यस्थळी जाऊन तेथे परिस्थितीशी भिडतात. शहरात मेट्रोच्या कामांमुळे शहरात खोदकाम केल्यामुळे सर्वत्र खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्याचा त्यांनाच एकदा फटका बसला. त्यांची गाडी वाहतुकीमध्ये अडकल्यावर त्या गाडीतून बाहेर पडल्या. तेथे चुकीच्या पद्धतीने काम करत असलेल्या २ अभियंत्यांना घेऊन त्या कार्यालयात गेल्या. त्यांना पंखा आणि वातानुकूलित यंत्र नसलेल्या खोलीत बसवून ठेवले. शिस्तीत काम करण्याची हमी मिळाल्यावरच त्यांना घरी पाठवले ! अशी त्यांची काम करण्याची पद्धत. बरं, त्यांच्यावर ‘वरून दबाव आणला’ असले प्रकार चालत नाहीत; कारण त्या अशा धमक्यांना बधत नाहीत. ‘जे करण्याचा एकदा निश्चय केला, ते करून दाखवीन’, हा त्यांचा बाणा. एका प्रसंगात तर ‘तुम्ही पंतप्रधान कार्यालयातून किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून मला दूरभाष करायला सांगा, तरच मी थांबेन’, असे त्यांनी सुनावले होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला कुणी जायचे धाडस करत नाही. ‘कानपूरमध्ये मुसलमानांच्या कह्यात असलेली १२५ मंदिरे सोडवणार’, असा निश्चय त्यांनी केला आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. एका पाठोपाठ एक अशी ७-८ मंदिरे त्यांनी आतापर्यंत शोधून अतिक्रमणमुक्त केली आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा पहाता त्या १२५ मंदिरे मुक्त करतील, याची हिंदूंना निश्चिती आहे. प्रमिला पांडे या ६८ वर्षांच्या आहेत. या वयातही जिवावर उदार होऊन मंदिरमुक्तीसाठी त्या देत असलेला लढा प्रेरणादायी आहे. प्रश्न हा आहे की, त्यांना जे कानपूरमध्ये जमले, ते अन्य हिंदु राजकारणी, तसेच पोलीस आणि प्रशासन यांना अन्यत्र का जमत नाही ?

आक्रमक कार्यशैली ! 

संभल, बरेली आणि अलीगड येथे मुसलमानबहुल भागांमध्ये मंदिरे सापडल्यावर प्रमिलाताईंनी प्रशासनात नोंदी असलेल्या; मात्र सध्या मुसलमानांच्या कह्यात असलेल्या कानपूरमधील १२५ मंदिरांची माहिती मिळवली. त्यानंतर त्या कामाला लागल्या. सकाळी उठून शिरस्त्राण घालून, अंगावर शाल लपेटून त्या मुसलमानबहुल भागात शिरतात. त्यांच्यासोबत पोलिसांचा फौजफाटा असतो. गल्लीबोळातून लोकांना विचारत त्या संबंधित मंदिर शोधून काढतात. तेथे पोचल्यावर स्वच्छता करतात. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लक्षात आल्यावर त्या मंदिराला टाळे ठोकून चावी प्रशासनाकडे सुपुर्द करतात. एरव्ही मुसलमानबहुल भागांत जायला पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घाबरतात; मात्र प्रमिलाताईंचा दराराच एवढा आहे की, आतापर्यंत त्यांनी जितक्या कारवाया केल्या आहेत, त्यांच्यावर दगड फेकण्याचे काय; पण डोळे मोठे करून बघण्याचे धारिष्ट्यही कुणी दाखवलेले नाही. ‘काही तरी वेडेवाकडे केले, तर पुढे काय होऊ शकते’, हे बहुधा मुसलमानांनाही ठाऊक असल्याने प्रमिलाताई कारवाई करत असतांना केवळ बघत बसणे, हेच त्यांच्या हातात असते.

दबावाचा परिणाम नाही ! 

मुसलमानांच्या कारवायांना प्रत्येक वेळी त्या पुरून उरल्या आहेत. अलीकडेच एका लहान मुलाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. त्यानंतर प्रमिलाताई घटनास्थळी पोचल्या. या मुसलमानबहुल परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझर बोलावला. आता त्यांना कोण रोखणार ? तेव्हा समाजवादी पक्षाच्या मुसलमान आमदार नसीम सोलंकी तेथे पोचल्या. त्या वेळी ‘तुम्ही येथे थांबला, तर येथे तणाव वाढेल. तुमचे किंवा माझे कुणाचेही प्राण गेले, तर येथे सर्वांनाच त्रास होईल’, असे प्रमिलाताईंनी सांगून त्या मुसलमान आमदाराला तेथून पिटाळून लावले आणि मुसलमानांनी केलेले अतिक्रमण तोडले. ही आहे प्रमिलाताईंची कार्यशैली !

एका मागून एक कह्यात असलेली मंदिरे सोडवत चालल्यामुळे मुसलमान नेत्यांना पोटशूळ उठला आहे. प्रमिलाताईंसमोर स्वतःचे काही चालणार नाही; म्हणून त्यांनी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ कायद्याचा आधार घेतला आहे. ‘वर्ष १९९१ च्या आधी असलेली धार्मिक स्थळांची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यास सांगितले असतांना प्रमिलाताई जुन्या गोष्टी उकरून कानपूर शहराची सौहार्दता बिघडवू पहात आहेत’, असा कांगावा करत मुसलमानांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली; पण असल्या तक्रारींसमोर झुकल्या, तर त्या प्रमिलाताई कसल्या ? त्यांनी थेट ‘मुसलमानांनी कह्यात घेतलेली मंदिरे सोडवणारच. तुम्हाला जे काही करायचे आहे, ते करा’, अशी थेट चेतावणीच त्यांना दिली. त्याही पुढे जाऊन ‘मंदिरे कह्यात घेऊन गुन्हा करणार्‍यांना कारागृहात डांबणार’, असा सज्जड दमही दिला.

प्रमिलाताई महापौर असल्यामुळे त्यांच्याकडे सत्ता आणि अधिकार आहे. तसा तो अन्य हिंदु लोकप्रतिनिधींकडेही आहे; मात्र त्यांनी जे करून दाखवले, ते अन्य का करून दाखवू शकत नाहीत ? याचे उत्तर म्हणजे प्रमिलाताईंकडे असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती होय. त्याच्या जोरावरच ते हिंदू आणि समाज यांच्या हितार्थ कार्य करत आहेत. प्रमिला पांडे यांच्यासारखी ठसठशीत कुंकू, भांगेत सिंदूर भरलेली महिला पदर खोचून धर्मरक्षणासाठी बाहेर पडते, तेव्हा विजय निश्चित असतो. अशा नारीशक्तीमुळेच हिंदु धर्माला पुनर्वैभव नक्की मिळेल, याची निश्चिती आहे !

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी हिंदुहितार्थ केलेले कार्य समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठी प्रेरणादायी !