प्रयागराजमध्ये थंडीची लाट आल्याने काळजी घेण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज – प्रयागराजमध्ये सध्या थंडीची लाट आली आहे. यामुळे लोकांनी स्वत:चे आणि आप्तेष्ट यांचे त्यापासून रक्षण व्हावे, अशी काळजी घ्यावी. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी पुढे नमूद केले आहे की, सर्व सरकारी रुग्णालयांत चांगल्या आरोग्य सुविधा आणि औषधे उपलब्ध करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. महाकुंभमेळ्यात येणारे साधू-संत, तीर्थयात्री, कल्पवासी, तसेच भाविक यांना आरोग्याच्या दृष्टीने साहाय्य होण्यासाठी आरोग्य विभागाच्या चमूला आदेश दिले आहेत. स्वच्छ आणि व्यवस्थित कुंभासह भाविकांची सुरक्षा हे आमच्यासाठी प्राधान्य आहे.