तन-मन-धनाच्या त्यागाने मिळेल आनंद ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
कलियुगी भक्ती करणे
जाते मजला कठीण ।
परम पूज्यांनी (टीप १) दिले
‘गुरुकृपायोग’ सुलभ साधन ।। १ ।।
स्वभावदोष निर्मूलनाने
निघेल आत्मचैतन्यावरील आवरण ।
अहं निर्मूलनाने जाता
येईल गुरुचरणांशी शरण ।। २ ।।
नामस्मरण म्हणजे परम पूज्यांचे ‘गुरुस्मरण’ ।
‘निर्विचार’ (टीप २) नामजपाने होते निर्गुणाचे ध्यान ।। ३ ।।
सत्संग म्हणजे परम पूज्यांचे अनुसंधान ।
जीवनाचे सार्थक करील त्यांचे चैतन्य ।। ४ ।।
सेवा म्हणजे परम पूज्यांचे आज्ञापालन ।
होईल याच जन्मात मनुष्य जन्माचे कल्याण ।। ५ ।।
प्रीतीने एकरूप होईल समष्टी गुरुरूपाशी मन ।
तन-मन-धनाच्या त्यागाने मिळेल आनंद ।। ६ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोग साधनामार्गातील शेवटच्या टप्प्यात ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितला आहे.
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.