महाकुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांचे आगमन !
प्रयागराज – महाकुंभमेळ्यात ४० कोटींहून अधिक भाविक येणार आहेत. काही जिहाद्यांचा कुंभमेळ्याला असलेला धोका लक्षात घेता, येथे अधिकाधिक सुरक्षाव्यवस्था करण्याचा उत्तरप्रदेश शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. महाकुंभ क्षेत्राला एका जिल्ह्याचा दर्जा दिल्यामुळे तेथे पोलीस ठाणी आणि पोलीस चौक्या यांसह एक वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिला आहे. यांसह अन्य सुरक्षायंत्रणांना येथे साहाय्यासाठी पाचारण केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीमा सुरक्षा दलाच्या एका तुकडीचे ८ जानेवारी या दिवशी प्रयागराज येथे आगमन झाले.