‘देवळात देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देवतातत्त्व कसे साकार होते ?’, हे कळण्यासाठी श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना विधीच्या कालावधीत देवळात ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा केलेला अभ्यास
‘गोव्यातील रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील परिसरात श्री भवानीदेवीसाठी नवीन देऊळ बांधण्यात आले. त्या नूतन देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
आपल्याला ठाऊक आहे की, देवळात एखाद्या देवतेची मूर्ती प्रतिष्ठापित केल्यावर तिच्यामध्ये त्या देवतेचे तत्त्व येते. देवतेचे तत्त्व, म्हणजे त्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने ! देवळाच्या कळसामुळे ब्रह्मांडातील देवतेची सूक्ष्मातीसूक्ष्म (निर्गुण स्तरावरील) स्पंदने आकर्षित होण्यास साहाय्य होते, तसेच देवतेच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारी सगुण स्तरावरील स्पंदनेही कळसाकडून प्रक्षेपित होतात. ही सर्व सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. ती लक्षात येण्यासाठी ‘देवळात देवतेची मूर्ती स्थापित करण्याअगोदर देवळातील स्पंदने कशी असतात ? देवळात देवतेची मूर्ती बसवल्यावर; पण तिच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथे स्पंदने कशी असतात ? मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्या दिवशी देवळात स्पंदने कशी असतात ?’ इत्यादींचा अभ्यास देवळातील नाद (कंपने) ध्वनीमुद्रित करून करण्यात आला. हा नाद १. देवळात भूमीलगत, २. भूमीपासून ३० सें.मी. अंतरावर, ३. देवळाचा घुमट (कळसाच्या खालचा अर्धगोलाकार भाग) आरंभ होतो तिथे आणि ४. देवळात घुमटामध्ये सर्वांत वरच्या ठिकाणी (कळसाला आरंभ होतो तिथे), अशा चार स्थानी ध्वनीमुद्रित करण्यात आला. प्रत्येक नाद हा एक ते दीड मिनिटांचा होता. ते सर्व नाद ऐकून मला आलेल्या अनुभूती आणि ‘त्यांवरून देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने देवीचे तत्त्व येण्याची काय प्रक्रिया घडली ?’, याची माहिती येथे दिली आहे. ८.१.२०२५ या दिवशी या लेखाचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871450.html
४. श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेशी संबंधित विधीच्या दिवशी
हा मुख्य विधी असल्याने त्याचा परिणाम लक्षात येण्यासाठी देवळात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठा विधीला आरंभ होण्यापूर्वी आणि तो विधी पूर्ण झाल्यावर देवळात नाद ध्वनीमुद्रित करण्यात आले. त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
४ अ : देवीच्या प्रतिष्ठापनेशी संबंधित विधींना आरंभ होण्याआधी ध्वनीमुद्रित केलेले नाद वरील अनुभूतींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. देवळात घुमटामध्ये कळसाला आरंभ होतो तिथे ध्वनीमुद्रित केलेल्या नादाच्या अनुभूतीवरून तेथे ब्रह्माची इच्छाशक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. कळसामुळे ब्रह्मांडातील निर्गुण शक्ती आकर्षित होऊन तिचे सगुण शक्तीत रूपांतर झाले.
२. देवळाचा घुमट आरंभ होतो तिथे ध्वनीमुद्रित केलेल्या नादाच्या अनुभूतीवरून तेथे शिवाची ज्ञानशक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. घुमटाच्या पोकळीमुळे तेथे ज्ञानशक्ती कार्यरत झाली.
३. देवळात भूमीपासून ३० सें.मी. अंतरावर ध्वनीमुद्रित केलेल्या नादाच्या अनुभूतीवरून तेथे स्थितीशी, म्हणजे देवीच्या स्थापनेशी संबंधित श्रीविष्णूची क्रियाशक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. देवळातील देवीच्या सगुण मूर्तीमुळे क्रियाशक्ती कार्यरत झाली.
४. देवळात भूमीलगत ध्वनीमुद्रित केलेल्या नादाच्या अनुभूतीवरून तेथे प्रत्यक्ष शक्ती जाणवली. शक्ती असते, तेथे शिव असतोच. त्यामुळे मला शिवाचे दर्शन झाले.
या अनुभूतींवरून लक्षात आले, ‘देवीच्या मूर्तीमुळे तेथे त्रिमूर्तींचे (शिव, विष्णु आणि देवी) अस्तित्व जाणवले.’ तसेच ‘देवळात इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती कार्यरत होतात’, हेही लक्षात आले.
३ आ : देवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेशी संबंधित विधी झाल्यानंतर ध्वनीमुद्रित केलेले नाद : या दिवशी देवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अंतर्गत प्रधान देवता श्री भवानीदेवी हिचा होम आणि तत्त्वहोम करण्यात आले. श्री भवानीदेवीचे तत्त्व यज्ञाद्वारे मंत्रशक्तीने ब्रह्मांडातून आकर्षित केले गेले. आकर्षित केलेले श्री भवानीदेवीचे तत्त्व कलशातील पाण्यात उतरवले गेले.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.१०.२०२४) (क्रमशः)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/872058.html
|