कुंभमेळ्याच्या ठिकाणी गुटखा, तंबाखू आणि विडी यांच्या टपर्या !
प्रयागराज, ८ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यासारख्या धार्मिक महोत्सवात अध्यात्मविषयक धार्मिक ग्रंथ, पूजासाहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात असतात; मात्र ही दुकाने लागण्यापूर्वीच कुंभमेळ्यामध्ये गुटखा, तंबाखू-विडी विक्रीच्या शेकडो टपर्या थाटण्यात आल्या आहेत. या टपर्यांवर गर्दी होत आहे. कुंभमेळ्याच्या ठिकाणी चालू असलेल्या प्रशासकीय कामांचे ठेके विविध ठेकेदारांना देण्यात आले आहेत. ही कामे करण्यासाठी सहस्रावधी कामगार कुंभमेळ्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. या कामगारांची अधिक वर्दळ या टपल्यांवर दिसून येत आहे.