Swasth Maha Kumbh : महाकुंभ येथे आतापर्यंत १० सहस्र रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार !
प्रयागराज – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार येथील महाकुंभात ठिकठिकाणी भाविकांना आरोग्य उपचार मिळत आहेत. आतापर्यंत महाकुंभ येथे १० सहस्र भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. केंद्रीय रुग्णालयासमवेत अरैल येथील केंद्रीय रुग्णालय येथे बाह्यरुग्ण विभाग चालू आहे. केंद्रीय रुग्णालयातील तज्ञ आधुनिक वैद्यांची ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या रुग्णालयांत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांवर विशेष उपचार करण्यास साहाय्य मिळत आहे. महाकुंभातील केंद्रीय रुग्णालयांत आधुनिक वैद्य मोठ्या उत्साहात रुग्णांची देखरेख करत आहेत.
महाकुंभ मेळ्यातील नोडल चिकित्सा स्थापन !
आधुनिक वैद्य गौरव दुबे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महाकुंभक्षेत्री ठिकठिकाणी भाविकांवर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत. सेक्टर २४ येथे उपकेंद्रीय (सब सेंट्रल) रुग्णालय चालू करून तेथे पूर्ण क्षमतेने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.