Additional Water Mahakumbh : महाकुंभपर्वानिमित्त गंगानदीत अतिरिक्त पाणी सोडण्यास प्रारंभ !

प्रयागराज – महाकुंभपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर त्रिवेणी संगमावर येणार्‍या भाविकांना नदीन स्नान करता यावे, यासाठी ‘टी.एच्.डी.सी.’ (टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) कडून पवित्र गंगानदीत अतिरिक्त पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. अतिरिक्त पाणी सोडण्याच्या उत्तरप्रदेश जलसिंचन विभागाच्या मागणीनुसार टी.एच्.डी.सी.ने ही मागणी केली आहे. टी.एच्.डी.सी.ने दिलेल्या माहितीनुसार देवप्रयागपासून ते प्रयागराजपर्यंत गंगा नदीवरील सर्वच घाटांवर भरपूर पाणी सोडण्यात आले आहे.