कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या भूमीवर मुसलमानांनी थडगे बांधून केले भूमीवर अतिक्रमण

  • हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण

  • ३ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंद

(थडगे म्हणजे मुसलमानाचे प्रेत पुरलेली जागा)

कन्नौज (उत्तरप्रदेश) – येथे मंदिराच्या भूमीवर थडगे बांधल्यावरून करण्यात आलेल्या विरोधाच्या वेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कामिल, नूर हसन आणि इबल हसन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या तिघांवरही मारहाण आणि धमकावणे असा आरोप आहे. मंदिराची भूमी बळकावण्यासाठी येथे थडगे बांधण्यात आले होते. त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर ही घटना घडली.

१. येथील उमराण गावात ७० बिघामधील (बिघा म्हणजे भूमी मापण्याचे एकक) ७ बिघा भूमी मंदिराच्या नावावर आहे, तर उर्वरित ६३ बिघा भूमी गावातील सोसायटीची आहे. आठवड्याभरापूर्वी ही भूमी मुसलमानांकडून नियंत्रणात घेण्याचा कट उघडकीस आला. त्यानंतर गावात रहाणारे महिपाल आणि काही गावकरी टेकडीवर गेले होते. येथे त्यांना एक थडगे दिसले. ती जागा बळकावण्याच्या उद्देशाने नुकतेच थडगे बांधण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे थडगे हिंदूंनी आधीच बांधलेल्या धार्मिक चौथर्‍यावर बांधलेले आहे.

२. या टेकडीवर बेकायदेशीररित्या उत्खननही होत असल्याचा आरोप होत आहे. खणकामामुळे अनेक ठिकाणी टेकडी सपाट झाली असून तेथे शेततळे निर्माण केले जात आहे. थडग्याला आणि शेततळे निर्माण करून होणार्‍या अतिक्रमणाला हिंदूंनी विरोध केला असता मुसलमान तेथे जमा झाले अन् त्यांनी हिंदूंवर दगडफेक केली. तसेच काही जणांना मारहाणही करण्यात आली. यात काही जणांनी तेथून पळ काढला; मात्र त्यांनी घटनेचे चित्रीकरण केले आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ शासन कठोर कारवाई करत असतांनाही धर्मांध मुसलमानांवर अद्याप वचक बसलेला नाही. यातून त्यांची वृत्ती कशी आहे आणि त्यावर आणखी कठोर होणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !
  • मुळात एखाद्याचे प्रेत पुरल्यानंतर त्यावर थडगे बांधले जाते; मात्र मुसलमान हिंदू आणि सरकार यांची भूमी बळकावण्यासाठी तेथे बांधकाम करून खोटे थडगे उभारत असतात ! अशांच्या विरोधात देशातील एकही मुसलमान संघटना आणि त्यांचे धर्मगुरु तोंड उघडत नाहीत. त्यातून सर्वच जण एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांच्यात गुन्हेगारी वृत्ती ठासून भरलेली आहे, हे स्पष्ट होते !