मस्साजोग प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे !
विरोधी पक्ष आणि भाजप यांच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना निवेदन
मुंबई – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे, या हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता १०३ अन्वये तात्काळ खुनाचा गुन्हा नोंद करा आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, कायद्याची कार्यवाही करणार्या अधिकार्यांचे दायित्व निश्चित करून कर्तव्यात कसूर करणार्या पोलीस कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करा, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांना दिले.
या प्रसंगी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार संभाजीराजे भोसले, भाजपचे आमदार सुरेश धस यांसह अन्य उपस्थित होते.