हिंदु राष्ट्रासाठी धर्मनिष्ठ आणि कर्तव्यपालन करणारे डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !
गोव्यातील डॉ. शिरीष शांताराम बोरकर हे एक प्रसिद्ध हृदयविकार शल्यचिकित्सक आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर (सौ.) अनुपमा शिरीष बोरकर याही प्रसिद्ध कर्करोग उपचार तज्ञ (ऑनकोलॉजिस्ट) आहेत आणि त्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णांची सेवा करतात. त्यांनी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी दत्तजयंतीच्या निमित्ताने (वेळेच्या अभावामुळे दत्तात्रेयचे पारायण करता येत नव्हते म्हणून) ‘सत्यदत्त व्रता’ची पूजा केली. पूजेनंतर सर्व गावकर्यांना लाभ व्हावा; म्हणून त्यांनी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शरदबुवा दत्तदास घाग यांचा ‘गीत दत्तात्रय’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याच डॉक्टर दांपत्यांनी यापूर्वी घराच्या परिसरात मोठा मंडप घालून वेगवेगळे शास्त्री आणि विद्वान यांना बोलावून त्यांचा आदर, सत्कार केला होता, तसेच यज्ञ, पूजा आदी विधी अन् महाप्रसाद यांचे आयोजन केले होते. ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी यांच्या ७ दिवसांच्या रामकथेचे आयोजन केले होते. हे सर्व आयोजन ते स्वखर्चाने करतात. त्यांनी स्वतःचा वाढदिवस पाश्चात्त्य पद्धतीने उपाहारगृहात मेजवानीचे आयोजन करून साजरा केला नाही, हे आजच्या जगात कौतुकास्पद आहे. हिंदु राष्ट्रासाठी असे धर्मनिष्ठ आणि कर्तव्यपालन करणारे डॉक्टर हवेत !
– डॉ. (सौ.) लिंडा बोरकर, फोंडा, गोवा.