परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली महानता !

प.पू. दादाजी वैशंपायन

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांना सेवेसाठी साधक हवा आहे’, हे कळल्‍यानंतर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी मला त्‍यांच्‍याकडे सेवेला पाठवले. तेव्‍हा मी एक महत्त्वाची सेवा करत होतो, तरीही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला योगतज्ञ दादाजी यांच्‍या सेवेसाठी पाठवण्‍याचे ठरवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला म्‍हणालेे, ‘‘तू करत असलेली सेवा अन्‍य कुणीही करेल; पण योगतज्ञ दादाजी यांच्‍यासारख्‍या महान संतांची सेवा मिळायला महाभाग्‍य लागते.’’ ‘आपल्‍याकडील एक महत्त्वाची सेवा करणारा साधक अन्‍य संप्रदायातील संतांची सेवा करायला पाठवणे’, हे विशेष आहे. यावरून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची महानता लक्षात येते. केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरच असे करू शकतात. योगतज्ञ दादाजी यांचे काही साधक त्‍यांना म्‍हणालेे, ‘‘तुम्‍ही तुमच्‍या सेवेसाठी योग्‍य साधक निवडला आहे. अगदी तुमच्‍या पठडीत बसतो.’’ त्‍यावर योगतज्ञ दादाजी म्‍हणायचे, ‘‘त्‍याला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी पाठवले आहे.’’

श्री. अतुल पवार

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीच माझी निवड करून मला योगतज्ञ दादाजी यांच्‍या सेवेसाठी पाठवले. त्‍यामुळे मी योगतज्ञ दादाजींना अपेक्षित अशी सेवा करून त्‍यांचे मन जिंकू शकलो. मला सेवेची संधी दिल्‍याबद्दल परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि योगतज्ञ दादाजी यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(ऑक्‍टोबर २०२४)