इतरांना सुधारण्यापेक्षा केवळ स्वतःला सुधारणे शक्य !
वस्तूतः दुसर्या कुणाला सुधारता येतच नाही. कुणी कुणाचे ऐकत नाही. महर्षि व्यासांसारख्या थोर माहात्म्यालाही, प्रज्ञावंत पुरुषालाही ‘माझे कुणी ऐकत नाही’, असेच म्हणावे लागले, तेथे सामान्यांची काय कथा ? सुधारणे शक्य आहे केवळ आपले आपणाला. तेथे मात्र सत्य काय आणि मिथ्या काय, याचा करता येईल तेवढा सूक्ष्म विचार करावा अन् मिथ्याचार टाळून सत्यनिष्ठ होण्याचा अहर्निश प्रयत्न करावा.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)