संपादकीय : महाकुंभ आणि हिरवी जमात !
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात घातपाताचे प्रकार घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचे वृत्त आहे. हिंदूंचा महाउत्सव चालू असतांना जगभरातील हिरवी जमात गप्प कशी राहील ? या पार्श्वभूमीवर योगी सरकार महाकुंभ निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच तो ‘न भूतो, न भविष्यति’ व्हावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. हिंदूंचा कुठलाही उत्सव असल्यास, त्यावर दगडफेक कर, पेट्रोलबाँब टाक, अशी कुकृत्ये करणार्यांचे हात महाकुंभची सुरक्षाव्यवस्था चोख असल्यामुळे बांधले गेले आहेत. त्यामुळे हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी त्यांनी आता ‘काव काव’ करण्यास आरंभ केला आहे. याच हिरव्या जमातीमधील एक असलेले ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी ‘महाकुंभ मेळा जिथे भरवला जात आहे, ती भूमी वक्फ बोर्डाची आहे’, असा दावा केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी ‘मुसलमानांचे हृदय किती विशाल आहे’, याचा पाढा वाचला. ‘असे विशाल हृदय असलेल्या मुसलमानांनी या भूमीवर मेळा भरू दिला आणि मोठे धाडस दाखवले’, असे त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात हिंदूंवर ‘आम्हाला महाकुंभ भरवण्यासाठी भूमी द्या’, अशी मुसलमानांकडे भीक मागण्याची वेळ आली असती; मात्र मुसलमानांच्या मोठेपणामुळे ही वेळ हिंदूंवर आली नाही’, असे मौलाना यांना हिंदूंना सांगायचे आहे. रझवी यांनी विशालहृदयी मुसलमान समाजाकडून हिंदु साधू-संतांनी बोध घेण्याचा फुकाचा सल्लाही दिला आहे. ‘भारतात मुसलमान हे गरीब बिच्चारे आहेत आणि हिंदु समाज अन् साधू-संत या गरीब बिच्चार्यांना छळत आहेत’, असे चित्र रझवी यांनी रंगवले आहे. हिंदूंवर उपकार केल्याची भाषा मौलानाने वापरल्यामुळे हिंदूंच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. ज्या गंगामातेच्या कुशीत हा मेळा होणार, ती आमची, ही पवित्र भूमी आमची, त्याही पुढे जाऊन हे राष्ट्र आमचे ! असे असतांनाही हा उद्दाम समाज हिंदूंना गुरगुरून दाखवत आहे. संधी मिळताच जिहादी कृत्ये करायची; मात्र ती करायला मिळाली नाहीत, तर वैचारिक आतंकवाद चालूच ठेवायचा, हे हिरव्या जमातीचे षड्यंत्र यातून दिसून येते. हिंदू जागृत झाल्यामुळे ते धर्मांधांचा काही प्रमाणात प्रतिकार करत आहेत. ते जागृत होऊ नयेत, यासाठी त्यांचे मानसिक आणि बौद्धिक पातळीवर खच्चीकरण करण्याचा हा मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. हिंदूंना वैचारिक पातळीवर याचा प्रतिवाद जोरदार करायला हवाच, त्याही पुढे जाऊन अशांवर कठोर कारवाई केली, तरच त्यांच्यावर वचक बसेल. येथे बांगलादेशात अटकेत असलेले चिन्मय प्रभु यांचा उल्लेख प्रामुख्याने करावासा वाटतो. चिन्मय प्रभु यांनी बांगलादेशात ठिकठिकाणी जाऊन स्वतःच्या ओजस्वी वाणीने हिंदूंना संघटित केले आणि हिंदूंच्या अत्याचारांच्या विरोधात वाचा फोडली. हिंदुहित जोपासणारी वक्तव्ये केल्यामुळे त्यांना कारागृहात टाकण्यात आले. भारतात शहाबुद्दीन रझवी यांच्यासारखे हिरव्या टोळ्यांचे प्रमुख असलेले त्यांचे अनेक नेते हिंदूंच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करतात. कुणी १० मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करते, तर कुणी हिंदूंच्या आया-बहिणींना पळवून नेण्याची वक्तव्ये करतात. अनेक सामाजिक माध्यमांमध्ये यांची वक्तव्ये प्रसारित होत असतात; मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. धर्मांध मुसलमानांकडून व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जो वैचारिक आतंकवाद पसरवला जात आहे, त्याला सरकार आळा का घालत नाही ?
तीर्थाटन आणि पेशव्यांची आठवण !
महाकुंभच्या काळात मुसलमानांकडून असे हिरवे फुत्कार काढले जात असतांना बाजीराव पेशव्यांची आठवण राहून राहून येते. त्यांच्या मातोश्री काशीबाई यांनी उत्तर भारतात तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि बाजीरावांनी त्यांची ही इच्छा पूर्णही केली. त्या काळी ही सोपी गोष्ट नव्हती. उत्तर भारतात निझाम आदी मुसलमान आक्रमक मराठ्यांवर वार करण्याची वाट बघत होते. बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री उत्तर भारतात येणार; म्हणजे या मुसलमान आक्रमकांच्या हाती आयते कोलित मिळण्यासारखे होते; पण असे काहीच झाले नाही. बाजीरावांची दहशतच एवढी होती की, काशीबाई तीर्थाटनाला गेल्यावर निझामाने पायघड्या घालून त्यांचे स्वागत केले. पेशव्यांच्या मातोश्रींच्या केसालाही धक्का लागला, तर त्यांच्या कोपाला सामोरे कोण जाणार ? तीर्थक्षेत्रे आतंकवादमुक्त कशी करायची ? आणि भाविकांना भक्तीभावाने तीर्थाटनाचा आनंद कसा मिळवून द्यायचा ? याचा पायंडा बाजीरावांनी घालून दिला. आज हिंदूंच्या पवित्र महाकुंभाच्या भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून हिंदूंना वेठीस धरण्याचा हिणकस प्रयत्न धर्मांध मुसलमानांकडून केला जात आहे. अशांवर जरब बसवण्यासाठी बाजीरावांसारखी रणनीती आणि कृती हवी. ‘हिंदूंच्या विरोधात कृती करणे सोडाच, त्यांच्या विरोधात बोलायच्या आधी १०० वेळा विचार करायला हवा’, अशी जरब धर्मांधांवर बसवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
वक्फ मंडळ विसर्जित करा !
भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी हल्ली मुसलमानांकडून ‘वक्फ मंडळ’ नावाचे हत्यार हिंदूंवर उगारले जात आहे. या मंडळाला अनिर्बंध अधिकार देण्यात आले आहेत. याच अधिकारांचा वापर करून भारतात ठिकठिकाणी हिंदूंच्या भूमी लाटण्याचा प्रकार मुसलमानांकडून होत आहे. यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंदूंची मंदिरे, त्यांची धार्मिक स्थळे ही वक्फच्या भूमीवर बांधल्याचा कांगावा अनेक वेळा केला गेला. एवढेच कशाला, सरकारी रुग्णालये, शाळा, प्रशासकीय कार्यालये ही वक्फच्या भूमीवर बांधली आहेत, अशा फुशारक्या मुसलमान मारत आहेत. मध्यंतरी ‘अख्खे गाव ही वक्फची भूमी आहे’, असेही सांगितले गेल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. ‘ही भूमी आमचीच’, हे पटवून देण्यासाठी हिंदूंना कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे जो मनस्ताप होतो, तो वेगळाच ! वक्फच्या नावाने हिंदूंना वाकुल्या दाखवण्याचे हे प्रकार कधी थांबणार ? मुसलमानांनी आमच्या भूमीवर दावे करत सुटायचे आणि आम्ही बचावात्मक पवित्रा घेऊन त्यांच्या आरोपांचे खंडण करत बसायचे, हे आता हिंदूंनी खपवून घेऊ नये. ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?
वक्फ मंडळ तात्काळ विसर्जित करून धर्मांध मुसलमानांचा माज सरकारने उतरवणे आवश्यक ! |