मंदिरे भक्‍तांच्‍या नियंत्रणात आली, तरच मंदिर संस्‍कृतीचे रक्षण होईल ! – श्री श्री अभिनव शंकर भारती महास्‍वामीजी, कूडली शृंगेरी महासंस्‍थान, कर्नाटक

  • कर्नाटक मंदिर महासंघाच्‍या दुसर्‍या परिषदेचा समारोप !

  • मंदिरांतून धर्मप्रचार करण्‍याचा ८०० हून अधिक विश्‍वस्‍तांचा निर्णय !

श्री श्री अभिनव शंकर भारती महास्‍वामीजी

बेंगळुरू (कर्नाटक) – आम्‍हीच सामाजिक, न्‍याय, कुटुंब आणि शिक्षण व्‍यवस्‍था एकामागून एक सरकारकडे सोपवली आहे. सरकारच्‍या अधीन रहाणे, ही समाजासाठी शोचनीय परिस्‍थिती आहे. समाजातील लोक प्रत्‍येक व्‍यवस्‍थेत धर्माच्‍या आधारे जगले, तर आपली सर्वांगीण उन्‍नती होईल. सरकारच्‍या कह्यातून मंदिरे परत घेतली, तरच समाजाचा पुन्‍हा विकास होऊ शकतो आणि मंदिर संस्‍कृतीचे रक्षण होईल, असे मार्गदर्शन कूडली शृंगेरी महासंस्‍थानचे श्री श्री अभिनव शंकर भारती महास्‍वामीजी यांनी केले. कर्नाटक मंदिर महासंघाच्‍या दुसर्‍या परिषदेच्‍या समारोपाच्‍या प्रसंगी त्‍यांनी वरील मार्गदर्शन केले. मंदिर परंपरांचे रक्षण करण्‍यासाठी कर्नाटक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत उपस्‍थित ८०० हून अधिक मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरातून धर्मप्रचार करण्‍याचा निर्णय घेतला. या अधिवेशनात श्री आदिशंकराचार्य शारदा लक्ष्मीनरसिंह पीठम्, दिविक्षेत्र हरिहरपूरचे श्री स्‍वयंप्रकाश सच्‍चिदानंद सरस्‍वती महास्‍वामीजी यांची उपस्‍थिती लाभली.

हिंदु युवा संघाची स्‍थापना केल्‍यास मंदिराच्‍या कार्यात तरुण सहभागी होतील ! – चक्रवर्ती सुलिबेले, संस्‍थापक, युवा ब्रिगेड

प्रत्‍येक मंदिराने श्रद्धेची प्रेरणा दिली पाहिजे, मंदिर धार्मिक शिक्षणाचे केंद्र असावे आणि धर्मसेवेचे केंद्र म्‍हणून कार्य करावे. तरुणांना सामाजिक कल्‍याणकारी कार्यात सहभागी करून घेणे, त्‍यांना कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्‍तीयोग शिकवून त्‍यांना आध्‍यात्‍मिकदृष्‍ट्या सक्षम बनवणे, हे मंदिरांचे दायित्‍व आहे.

‘सनातन मंडळा’च्‍या निर्मितीसाठी हिंदू ऐक्‍य आवश्‍यक आहे ! – अधिवक्‍त्‍या प्रमिला नेसरगी, वरिष्‍ठ अधिवक्‍त्‍या, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

भारत पवित्र भूमी आहे आणि ती बहुसंख्‍य हिंदूंचे संरक्षण, तसेच मंदिरांचे संरक्षण सुनिश्‍चित करते. प्रभु श्रीरामाच्‍या आदर्शाने सनातनच्‍या परंपरेत सत्‍य आणि धर्म यांचा विजय होईल. मंदिरांशी संबंधित सर्व लोकांनी धार्मिक परिषदांमध्‍ये सहभागी व्‍हावे, जेणेकरून ‘सनातन मंडळा’च्‍या निर्मितीचे ध्‍येय शक्‍य होईल.

पू. रमानंद गौडा

धार्मिक शिक्षण देणे, हे मंदिरांचे दायित्‍व ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

प्राचीन काळापासून मंदिरे धर्मशिक्षण देणारी विद्यापिठे असून ती शिल्‍पकला, नृत्‍य, संगीत, चित्रकला यांसारख्‍या कलांचे भांडार म्‍हणून काम करत आहेत. वर्ष १८३५ च्‍या ब्रिटीश शिक्षण कायद्याने गुरुकुल शिक्षण रहित करण्‍यात आले. परिणामी आतापर्यंतच्‍या सर्व पिढ्या धार्मिक ज्ञानापासून वंचित राहिल्‍या. त्‍यामुळे आज धर्मांतर, देवतांचा अपमान आणि हिंदूंमध्‍ये अभिमान नसणे अशा समस्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. धार्मिक शिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था पूर्ववत् करण्‍यासाठी प्रयत्न करावे लागतील. मंदिरांनी भक्‍तांना धर्माचे शिक्षण दिले पाहिजे, त्‍यातून देशभक्‍त पिढी निर्माण होईल.

श्री. सुनील घनवट

मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्‍त करण्‍यासाठी एकजुटीने लढा देणे आवश्‍यक ! – सुनील घनवट, राष्‍ट्रीय समन्‍वयक, मंदिर महासंघ

भारतातील ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारांनी हिंदूंच्‍या मंदिरांवर नियंत्रण मिळवले आहे, त्‍यांचा खजिना लुटला आहे आणि धार्मिक कार्यांना कोणतेही समर्थन दिलेले नाही. हिंदूंना जागृत करण्‍यासाठी आणि मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांना संघटित करण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ब्रिटीश सरकारने वर्ष १९२७ मध्‍ये मंदिरांवर सरकारी नियंत्रण आणले आणि भारताच्‍या स्‍वातंत्र्यानंतरही मंदिरे मुक्‍त झाली नाहीत. मंदिरे नियंत्रणात घेण्‍याच्‍या विरोधातील संघर्षाची तीव्रता वाढवली पाहिजे. दुसरीकडे मंदिरांची पवित्र भूमी वक्‍फ बोर्ड राक्षसी कायद्याद्वारे कह्यात घेत आहे. मंदिराशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत् करून वक्‍फ बोर्डाच्‍या त्रासापासून मंदिरांचे संरक्षण करावे.

धर्मपालन केले, तरच विश्‍वशांती शक्‍य ! – पू. सिद्धलिंग स्‍वामीजी

संस्‍कृती जोपासण्‍याचे कार्य मंदिर करू शकते. मंदिरे आणि मठ यांच्‍यामध्‍ये वेदपठण, सामूहिक पूजा, यज्ञ इत्‍यादींच्‍या माध्‍यमातून जनजागृती करावी. धर्माच्‍या माध्‍यमातून विश्‍वशांती शक्‍य आहे, मानवाने धर्माचे मूल्‍य जोपासले, तर विश्‍वकल्‍याण शक्‍य आहे. जग हे आमचे घर आहे.

हिंदु संस्‍कृती टिकण्‍यासाठी जागृती आवश्‍यक ! – वेदब्रह्म श्री इंद्राचार्य

प्रत्‍येक मंदिराच्‍या माध्‍यमातून हिंदु धर्म आणि संस्‍कृती जपण्‍याचे अन् हिंदु धर्माची जागृती करण्‍याचे महत्त्वपूर्ण कार्य होऊ शकते.

धर्मपालन केले, तरच विश्‍वशांती शक्‍य ! – पू. सिद्धलिंग स्‍वामीजी

संस्‍कृती जोपासण्‍याचे कार्य मंदिर करू शकते. मंदिरे आणि मठ यांच्‍यामध्‍ये वेदपठण, सामूहिक पूजा, यज्ञ इत्‍यादींच्‍या माध्‍यमातून जनजागृती करावी. धर्माच्‍या माध्‍यमातून विश्‍वशांती शक्‍य आहे, मानवाने धर्माचे मूल्‍य जोपासले, तर विश्‍वकल्‍याण शक्‍य आहे. जग हे आमचे घर आहे.

हिंदु संस्‍कृती टिकण्‍यासाठी जागृती आवश्‍यक ! – वेदब्रह्म श्री इंद्राचार्य

प्रत्‍येक मंदिराच्‍या माध्‍यमातून हिंदु धर्म आणि संस्‍कृती जपण्‍याचे अन् हिंदु धर्माची जागृती करण्‍याचे महत्त्वपूर्ण कार्य होऊ शकते.

‘सनातन पंचांग अँड्रॉईड अ‍ॅप २०२५’चे लोकार्पण आणि सनातननिर्मित ग्रंथाच्‍या ‘ई बुक’चे प्रकाशन

‘सनातन पंचांग अँड्रॉइड अ‍ॅप २०२५’चे लोकार्पण करतांना डावीकडून ‘हिरेमठ संस्‍थान’चे पू. निरंजन शिवाचार्य स्‍वामीजी, वेदब्रह्म श्री इंद्राचार्य, सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, अक्‍कलकोट (महाराष्‍ट्र) येथील ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठा’चे अध्‍यक्ष श्री. प्रसाद पंडित, ‘श्री स्‍कंदेश्‍वर मंदिरा’चे पू. सिद्धलिंग स्‍वामीजी

या परिषदेत ‘सनातन पंचांग अँड्रॉईड अ‍ॅप २०२५’चे लोकार्पण करण्‍यात आले. त्‍यानंतर सनातननिर्मित ‘आयुर्वेदाचे पालन करून औषधांशिवाय निरोगी रहा’, या ग्रंथाच्‍या ई-बुकचे प्रकाशन करण्‍यात आले. ‘सनातन पंचांग अ‍ॅप’मध्‍ये दैनंदिन माहिती, पंचांग, मुहूर्त, सण-उत्‍सव, अध्‍यात्‍म, आयुर्वेद आणि धर्मशिक्षण यांच्‍याशी संबंधित लेखही उपलब्‍ध आहेत.