आधुनिक वैद्यांनी मृत म्हणून घोषित केल्यानंतरही हरिनामाचा जप करणारे वारकरी पांडुरंगतात्या उलपे परत जिवंत !
कोल्हापूर – १६ डिसेंबरला कसबा बावडा येथील ६५ वर्षीय वारकरी पांडुरंगतात्या उलपे यांना हरिनामाचा जप करत असतांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. विविध उपचार केल्यानंतरही यश न आल्याने आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या घरी अंत्यविधीची सिद्धता झाली. दुसरीकडे मात्र रुग्णवाहिकेतून पांडुरंगतात्या यांना घरी नेतांना रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची परत हालचाल चालू झाली. यामुळे त्यांना परत रुग्णालयात भरती करण्यात आले. काही उपचार करून त्यांना ३० डिसेंबरला घरी सोडण्यात आले.
पांडुरंगतात्या हे वारकरी संप्रदायाचे असून ते शेतमजूर म्हणून काम करतांना नेहमी हरिनामातच तल्लीन असतात. कोल्हापूर जिल्हा हा विशेष करून पुरोगामी असल्याचे सांगितले जाते. अशा जिल्ह्यातच ईश्वराच्या भक्तीने आणि नामजपाने काय होऊ शकते ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पांडुरंगतात्या होय ! हे उदाहरण म्हणजे आधुनिक वैद्य आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यासाठीही झणझणीत अंजनच आहे.