पुष्कळ गर्दीमुळे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात गोंधळ !
भिवंडी – बागेश्वर महाराजचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुष्कळ गर्दी झाली होती. त्यांनी भक्तांना अंगारा देण्यासाठी सर्वांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले; मात्र लोक एकमेकांना ढकलून किंवा एकमेकांच्या अंगावरून पुढे जात होते. गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षारक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. काही महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अशी परिस्थिती उद्भवल्याने पंडित धीरेंद्र शास्त्री यांना व्यासपिठावरून जावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.